________________
परीसस्पर्श
२३
पापदृष्टीने बघणार देखील नाहीं ! कसलाहि प्रसंग आला, कितीहि दर्दशा झाली, कसल्याहि भयंकर विपत्तीने गांठिले. संकटांनी पाठ 'पुरविली, मनोविकारांच्या उछंखलतेचा कडेलोट झाला, या देहाला जिवंत जाळले किंवा त्याचे राई राई एवढाले तुकडे केले, तरी रूपिणी मरेपर्यंत ह्मणून आपले हे व्रत बिलकुल भंगू देणार नाही ? मी ही प्रतिज्ञा याच वेळी याच पायाला स्मरून करितें ?"
या वेळी त्या साधुवर्यांच्या प्रशांत मुद्रेवरहि प्रसन्नतेची किंचित छटा उमटल्याखेरीज राहिली नाही.
रूपिणीच्याने पुढे बोलवेना ! तिचा कंठ दाटून आला आणि नेत्रांतून अश्रुवर्षाव होऊ लागला. त्या महात्म्याच्या चरणावर आपले डोके पुन्हा एकदां ठेवून ती तेथून मोठ्या कष्टाने निघाली.
घेतलेले हे व्रत तिने कसे काय पाळले हे पुढे समजेलच. रस्त्याने जातांना ती स्वतःशीच ह्मणूं लागली:
"आजपर्यंत किती तरी पुरुषांचा स्पर्श या देहास झाला, पण माझं सर्वस्वी रूपांतर करणारा असा हा स्पर्श पहिलाच. परीसस्पर्श ह्मणतात तो हाच काय ? "
RIMANN