________________
२२
रूपिणी.
ठेवणे किंवा त्यांचे भयंकर सर्प बनविणें हें केवळ तुझ्या मनाबलावर आणि शील रक्षणाच्या निश्चयावर अवलंबून आहे. हीं दोन्हीं जर निश्चल असतील तर तुला त्यांच्याकडून बिलकुल पीडा होणार नाहीं, आणि तीं अशीं निश्चल ठेवण्याचें सामर्थ्य तुझ्याच काय, पण प्रत्येक मानवी आत्म्याच्या ठिकाणी आहे.
""
"
"मग महाराज, मला पतीचाहि त्याग करावा लागेल काय ? " नाही. रूपिणी, तुला हें व्रत पाळावयासाठीं पतित्यागाची आवश्यकता नाहीं. संसारत्यक्त साधूना किंवा साध्वींनाच पत्नि पतिसंबंधाचा सर्वस्वी त्याग करण्याची आवश्यकता असते, पण शीलवताच्या बाबतीत संसारी जनांना हा कडक निर्बंध लागू नाहीं. संसारी स्त्रीपुरुषांनी स्वतःच्या पतिपत्नीसमागमांत संतुष्ट राहणे ह्मणजेच शील पाळणें होय. जगांत विवाहसंस्था याच कार्यासाठी अस्तित्वांत आली असून दुर्बळ मनाच्या स्त्रीपुरुषांस या योगानें आत्मोधाराचा फारच सोपा मार्ग निर्माण झाला आहे. ह्मणून रूपिणी खिचपत असलेल्या नरकांतून निघा - वयाची तुझी अजूनहि इच्छा असेल तर तूं याच घटकेला हे व्रत घे आणि तें आजन्म निश्चयाने पाळ.
"
रूपिणीचा निश्चय केव्हांच झाला होता. फक्त ती त्यांच्या आशिवादात्मक प्रोत्साहनासाठींच कांहीं थोडा वेळ थांबली होती. त्यांचे भाषण पूर्ण होतांच तिने उभे राहून त्यांच्या पायावर हात ठेविला आणि ह्यटलें :
“भो ! परम करुणामय साधुवर्य, आपल्या या परम बंद्य, परम निर्मल आणि पतित जनसंरक्षक चरणावर हात ठेवून सांगतें कीं, या पुढें ही रूपिणी, पतीखेरीज अन्य कोणत्याहि पुरुपास स्पर्शच काय पण
"