________________
परीसस्पर्श.
१७
नरक कशा प्रकारचा असतो, आणि असल्या पातकी जीवांना तेथें कसल्या दारुण यातना भोगाव्या लागतात याविषयींचीं वर्णनें निरनिराळ्या धर्मग्रंथांतून वाचकांच्या कानांवर नेहमीच येत असल्यामुळे रूपिणीनें या क्षणभराच्या काल्पनिक नरकवासांत कसल्या कसल्या दारुण यातना भोगिल्याचें अनुभविलें तें येथें सविस्तर सांगण्याची आवश्यकता नाहीं.
मुनीच्या पायांवर लोळण घेतलेली रूपिणी बऱ्याच वेळानें शुद्धि वर आली. तिला भरलेली धडकी अजूनहि कमी झाली नव्हती ! अजूनही तिचें काळीज जोराजोरानें उडत असून सारे अंग घामाघूम झालें होतें ! आपण पाहिलेला तो भयानक देखावा, आणि भोगिलेले दारुण क्लेश ही सर्व खरीच होतीं असेंच अजूनहि तिला वाटत होतें. ती जरा शांत झाल्यावर मुनि बोलूं लागले:
" रूपिणी, आपल्या या निंद्य दुर्गुणांमुळे आपणास परलोकीं काय शासन मिळेल हें तूं पाहिलेंसच. मरणानंतरचा नरक तुला दिसून आलाच, पण या निद्य दुर्गुणांमुळे इहलोकींही जो नरक तूं निर्माण केला आहेस तिकडे तुझी नजर कधीं गेली आहे काय ? हा नरक त्या नरकापेक्षा कोणत्याहि प्रकारे कमी भयंकर, कमी दुःसह किंवा कमी यातनावह नाहीं ! इतकेंच नव्हे, तर कांहीं कांहीं बाबतीत हा त्यापेक्षांहि जास्त भयंकर आहे ! परलोकच्या नरकांत तुझ्या पापाबद्दल तुला स्वतःलाच शासन भोगावें लागेल, पण या इहलोकच्या नरकांत तुजबरोबरच तुझ्या प्रियजनांना आणि नातलगांनाही असा क्रेश भोगावे लागत आहेत; रूपिणी, याचा-या ऐहिक नरकाचा - या जिवंतपणांतल्या रौरवाचा तूं कधीं तरी विचार केला आहेस काय ? या पापामुळे तुझें मन प्रत्येक क्षणी कसे साशंक