________________
परीसस्पर्श.
१५
आपणाशिवाय मला प्रत्यक्ष स्वर्ग जरी मिळाला तरी तो शुद्ध नरका
सारखा वाटेल."
(.
सुख ! सुख! सुख! हे अभागिनी । " ते शांतचित्तमुनि मोठ्या गंभीरपणानें ह्मणाले, " तूं केवढ्या गाढ अज्ञानतिमिरांत बुडाली आहेस, आणि तुझें सुखलोलुप मन विकारवशतेच्या भरांत भलत्याच गोष्टीला कसें कवटाळत आहे. सुखाची इच्छा प्रत्येक प्राणिमात्रास असते आणि त्याप्रमाणें तुला त्याची तळमळ लागून रहावी हैं साहजिक आहे. पण सुखाविषयींची तुझी समजूत मात्र चुकीची आहे. खरें मुख आणि तुझी त्याविषयींची समजूत यांत पाणी आणि अग्नि, किंवा दिवस आणि रात्र यांप्रमाणें विरोध किंवा अंतर आहे. तूं मुख समजून ज्याच्या मागे लागली आहेस, आणि अनियंत्रितपणें ज्याचा अनुभव येत आहेस, तो विषयोपभोग खरोखरच खरें सुख आहे काय ? जर तसें असेल, तर मुखा - विषयीं तुला जी अजून तळमळ लागून राहिली आहे ती कां ? सुख मिळूनहि सुखाची इच्छा कशी रहावी ? यावरून आपण भयंकर भ्रमांत पडलों आहों हें नाहीं कां तुझ्या लक्षांत येत ? तुझ्या बाबतीत बोलावयाचें ह्मणजे हा नुसता भ्रमच नव्हे तर दारुण अध:पात आहे ! इंद्रियवेदना शमविण्याच्या प्रयत्नांत विकृत मनास क्षणैक वाटणाऱ्या आनंदास सुख समजून, तूं हें कसले भयंकर विपप्राशन करीत आहेस, याची कल्पना तरी आहे काय ? या - योगाने तुझ्या आत्म्याची काय भयंकर स्थिति होईल, तुला कसल्या यातना भोगाव्या लागतील, याचा तूं कधीं तरी विचार केला आहेस -काय ? कां तो विचार मनांत येऊनहि तूं बेहोपपणानें तिकडे दुर्लक्ष करीत आहेस ? काय व्यभिचारी जीवांना परलोकीं होणाऱ्या भयंकर