________________
परीसस्पर्श.
१३.
यावेळीं प्रातःकाळचे आठ वाजण्याचा सुमार होता. सृष्टीचें स्वरूप अजूनही सौम्य आणि रमणीय असेंच होतें. आणि मुनीश्वर तें अवलोकन करून त्याजवरून सुचणाऱ्या अनेक विचारतरंगांत मग्न होऊन गेले होते. ते अत्यंत सुस्वरूप असून तपःश्रीने त्यांची कांति अधिकच खुलून दिसत होती. त्यांची मुद्रा अत्यंत शांत असून तिध्यांत एवढा मोहकपणा भरला होता. कीं. पाहणारांस एकसारखें तिजकडे पाहतच राहावेंसें वाटे !
त्याना पाहतांच रूपिणीच्या मनांत अनावर मोह उत्पन्न झाला, आणि ती आपला मार्ग सोडून त्यांच्याकडे वळली.
ती त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिलेल्यास बराच वेळ झाला तरी कोणाच्याच तोंडून एक शब्दही निघाला नाहीं. मुनि आपणास कोण कोठील वगैरे प्रश्न विचारतील, नंतर आपण आपला मनोदय त्यांना कळवू, असा तिचा बेत होता. पण मुनि आपल्याच ध्यानांत मन ! त्यांनी तिजकडे नुसतें ढुंकून देखील पाहिले नाहीं ! बराच वेळ वाट पाहून कंटाळल्यामुळे ती आपण होऊनच मुनींस बोलं लागली. ती ह्मणाली:
((
---
महाराज ? किती वेळ तरी मी आपणाजवळ उभी राहिले आहे ! पण आपण मजशी एक अक्षर देखील बोलत नाहीं ! कां बरं, मी आपल्या कृपेला पात्र नाहीं कां ? महाराज, जिच्या प्राप्तीकरितां शेंकडों तरुण लोक आपल्या सर्वस्वावरही पाणी सोडावयास तयार होतात, ती आपण होऊन तुमच्याकडे आली असतां तुह्मी तिजकडे नुसता डोळा उघडूनही पाहूं नये ! माझ्या सुखाची गोष्ट एका बाजूला राहू द्या. पण स्वतःच्या मुखाविषयीही तुझीं इतके बेफिकीर कसे ? तुझांला स्वतःला याचें कांहीं इतकं वाटलं नसेल,