________________
V
प्रकरण २ रें.
परीसस्पर्श!
। वदत्ताशी संकेत करून रूपिणी आपल्या शेताकडे जाण्यास निघाली, हे मागील प्रकरणांत सांगितलेंच आहे. घराबाहेर पडून स्वतंत्र राहण्यांत फारच सुख
असते असे तिच्या मनाने पके घेतले असल्यामुळे, देवदत्ताबरोबर पळून जाण्याचे तिने अगदी ठाम ठरविले होते. या भावी मुखाच्या मनोराज्यांत गुंग होऊन चालली असतां, रस्ता सोडून जरा बाजूस पण जवळच शिलाशकलावर बसलेल्या एका तेज:पुंज तरुण मुनीवर तिची अवचित दृष्टि गेली.
हे मुनि ऐन तारुण्यांत असून त्यांची पंचविशी देखील अजून उलटली नव्हती. अशा वयांत वैराग्य प्राप्त होऊन सकल विषयसुखोपभोगांचा त्याग करणे ही गोष्ट काही सामान्य नव्हे. या वयांत जे मनोविकार वर्षाकालांतील जलौघाप्रमाणे कोणत्याहि प्रतिबंधाला न जुमानतां कनककामिनी--विलासाकडे धांवावयाचे, त्यांस स्थिर करणा-या-नव्हे उलट गति देणा-या-परमार्थाकडे वळविणा-या या महाभागाचें आत्मिक सामर्थ्य, वर्णन करण्याची शक्ति कोणाच्या लेखणीत आहे ?
अशा वयांत वैराग्य प्राप्त होण्यास पूर्वजन्मांतील शुभ कर्मे कारणीभूत असतील, पण तदनुसार असिधारातुल्य खडं नरें व्रतांचें पालन करणे यांत अलौकिक पुरुषार्थ नाही असे कोण मगेल !