________________
आरंभीचे दोन शब्द.
प्रस्तुत पुस्तकांतील कथानक मूळ श्रेणिकपुराणांतील असून, मला तें बरेंच मनोरंजक व बोधप्रद वाटल्यावरून त्यास प्रस्तुतचा साधा वेष देऊन मी तें वाचकांपुढे ठेवीत आहे. यांतील अद्भुतता मुळांतीलच असून, तीत किंवा मूळच्या एकंदर संविधानकांत, सुसंगत करण्यापलीकडे मी कोणताहि विशेष फेरफार केला नाही. प्रस्तुत पुस्तक लिहिण्यांत मूळ कथानकाचे स्वरूप कायम ठेवावें हाहि माझा एक उद्देश असल्यामुळे या बाबतीत पुराणकाराशी एकरूप होण्याखेरीज मला गत्यंतरच नव्हते! ह्मणून अद्भुततेच्या बाबतीत वाचकांकडून मजवर कोणत्याहि प्रकारचा आरोप लाधिला जाणार नाही अशी आशा आहे ! कथानक खुलून दिसावे एवढ्यासाठी यांत दिलेली वर्णने व भाषणे पात्र माझ्या पदरची आहेत. ती कशी काय साधली आहेत हे ठरविणे रसिक वाचकांचें काम आहे. त्यांना विशेषतः आमच्या जैनबंधूंना माझा ही कृति आवडल्यास अशा प्रकारची जैनपुगणांतील कथानकें पुढे आणण्यास त्यांजकडून मला शक्य तें साह्य मिळेल अशी आशा आहे.
प्रस्तुत पुस्तकाच्या अंतरंगासंबंधी एवढे सांगितल्यानंतर हे ज्यांच्या निरपेक्ष आणि उदार सहाय्यामुळे इतक्या सुंदर बाह्यवेषाने वाचकांपुढे येत आहे त्यांचे आभार मानणे हे माझे पहिले कर्तव्य आहे. हे थोर गृहस्थ ह्मणजे नागपूरचे प्रख्यात उदारधी धनिक स्वर्ग संघई गुलाबसावजी यांचे सत्पुत्र शेट मोती. लालजी होत. यद्यपि आपल्या नांवाचा नुसता उल्लेख करण्याचा हि त्यांची इच्छा नव्हता, तरी माझ्या कृतज्ञ लेखणीस त्यांच्या या इच्छेप्रमाणे वागणे केवळ अशक्य झाले याबद्दल ते मला क्षमा करताल अशी आशा आहे. यांच्याबरोबरच ज्यांचा साभार नामोल्लेख करणे अत्यतं आवश्यक आहे असे दुसर सदगृहस्थ ह्मणजे त्यांचेच कारभारी श्रीयुत कनयालालजी हे होत.श्रीयुत शेट मोतीलालजी यांच्या उदारतेइतकीच यांचीही रसिकता प्रस्तुत पस्तकाच्या बाबतीत मला सहाय्यभूत झाली आहे.
याशिवाय या पुस्तकास आगाऊ आश्रय देणा-या रसिकमंडळाचा,व वळवर आणि सुबक काम करून दिल्याबद्दल लक्ष्मीनारायण प्रेसचे मनेजर व चित्रकार श्रीयुत कापरे यांचाही मी आभारी आहे.