________________
प्रस्तावना
नाहीत एवढे तरी सिद्ध होते. एखाद्या विशिष्ट गोष्टीसंबंधी दोन उत्तरकालीन पुराव्यांत परस्परविरोध दिसून आल्यास दोन्ही मते एकाच दृष्टीने केव्हाही प्राह्य ठरणार नाहीत. दोहोपैकी एकच कोणते तरी ग्राह्य आणि दुसरें त्याज्य ठरवावे लागेल. ग्राखाप्राह्यतेचा हा प्रश्न अति गंतागुंतीचा आणि म्हणूनच बिकट आहे. विद्वान आणि अनुभवी संशोधकांकडूनहि या बाबतीत कित्येकदा बुका होतात. एखाद्या बाबतीत पुरावे अगदी गौण असतील तर ऐतिहासिक तकीवरच भिस्त ठेवावी लागते आणि आपली अनुमानाने फारच जपून करावी लागतात.
हिंदुस्थानासारख्या ह्या एका मोठ्या खंडांत समाविष्ट झालेले लोक मानवशांच्या एकाच शाखेचे आणि संस्कृतीचे आहेत असेही नाही. भौगोलिक परिस्थितीच्या भिन्नतेमुळे त्यांच्या स्वभावधर्मातही भिन्नता उत्पन्न झालेली आहे. अशा लोकांचा धार्मिक इतिहास लिहिताना कुशाग्र बुद्धीच्या मनुष्यानेहि फार सावधानता राखली पाहिजे. भिन्न संस्कृतींचे लोक एकाच ठिकाणी फार दिवस राहिल्यामुळे त्यांच्यांतील सांस्कृतिक विभिन्नता सकृद्दर्शनी दिसून येत नाही. ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे काही धार्मिक इतिहासकारांनी हिंदुस्थानातील सर्व लोकांत एकच सांस्कृतिक प्रवाह प्रस्थापित करण्याचा चुकीचा प्रयत्न केला आहे.
हिंदुस्थानांत प्राचीन वाङ्मयाचे संरक्षण मौखिक परंपरेनेंच झाले. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत त्याचा बराच मोठा भाग स्मृतींतून नष्ट झाला असला पाहिजे यांत शंका नाही. तथापि एका संस्कृर्ताच्या वाङ्मयाचा एक भागऋग्वेदादिग्रंथ-आजतागायत शाबत राहिला आहे हे मुदेवच म्हणावयाचें. जगांत कोणत्याहि संस्कृर्ताच्या ग्रंथात ते सर्वाहून प्राचीन आहेत. ह्या ग्रंथांची प्राचीनतमता ग्राह्य केल्यानंतर त्यांच्या कालनिर्णयाच्या वादग्रस्त प्रश्नांत शिरण्याचे आज कांहींच प्रयोन नाही. हे ग्रंथ आर्यांचे अनून हे आय हिंदुस्थानचे मूळ रहिवासी नसून बाहेरूनच हिंदुस्थानांत आलेले असावेत असा भाषाशास्त्रज्ञांचा तर्क आहे. ऋग्वेदांतील भौगोलिक वर्णनाचा कांहों भाग हिंदुस्थानला लावतां येत नाही. अर्थत् ऋग्वेदाचा काही भाग आय हिंदुस्थानांत येण्यापूर्वीच रचला गेला असला पाहिजे. त्या वर्णनावरून पाहतां काही भाग पंजाबांत लिहिला गेला असला पाहिजे यात शंका नाही. ऋग्वेदकालांतील आर्याचा प्रवेश मध्य