________________
महावीरचरित्र
राष्ट्रीय जीवनाचे विशिष्टतत्त्व ज्याप्रमाणे अर्थकारण आहे याप्रमाणे हिंदुस्थानच्या राष्ट्रीय जीवनाचें विशिष्ट तत्व धर्मकारण आहे.
अफाट विस्तार आणि प्राकृतिक विभाग त्यामुळे इतर दृष्टींनीं हिंदुस्थानच्या लोकांत अनेक भेद असले तरी धार्मिक जीवनाचें हें विशिष्ट तत्त्व सर्वत्र सारखे आढकून येते. ह्या जीवनाचे अनेक सांप्रदाय होत जाऊन परस्परविरोधही उत्पन्न झाला, ह्याचें कारण त्या विशिष्ट तत्त्वाची प्रबलताच. इतके धर्म एका ठिकाणी असलेला देश पृथ्वीच्या पाठीवर हिंदस्थानाशिवाय दुसरा नाहीं. इतरत्र क्षुल्लक बाबतीतसुद्धां परस्परविरोध दिसून येईल. पण हिंदुस्थानांत जीवनांतील विशिष्ट धार्मिक तवामुळे सहिष्णुता हा हिंदुवासीयांचा सामान्य स्वभावधर्मच झालेला आहे. ग्रीक, यवन, मोगल, इंग्रज हे सर्व आपापले धर्म घेऊनच हिंदुस्थानांत आले, आणि ते सर्व आज चिनहरकत हिंदवासी होऊन राहिले आहेत. कांहीं केवळ देश पाहण्याच्या जिज्ञासेने आले, काहीं त्या सुवर्णभूमीतील संपत्ति लुटण्याकरितां आले आणि कांहीं व्यापाराच्या उद्देशाने आले. राजकीय दृष्टीनें हिंदुस्थानला ह्या लोकांचं दास्यत्व पत्करावे लागले असले तरी सांस्कृतिक दृष्टीनें हिंदुस्थानचा जयच झालेला आहे. " जिंकणारी जात जित जातीकडून सांस्कृतिक दृष्टीनें नेहमी जिंकली जाते " हैं विधान हिंदुस्थानच्या बाबतीत तरी अक्षरशः खरे ठरते.
वरील विवेचनावरून हिंदुस्थानचा धार्मिक इतिहास लिहिणं किती अवघड आहे हे सहज कळून येईल. एखादी भावनाप्रधान कादंबरी लिहिणें त्या मानानें फारच सोपें आहे. ज्यांना इतिहासांत अत्यंत महत्त्व आहे असे समकालीन पुरावे मिळणें प्रायः अशक्य असते, अशा पुराव्यांच्या अभावीं उत्तरकालीन आणि परंपरागत किंवा दंतकथात्मक पुराव्यावरच सर्व भिस्त ठेवावी लागते. तथापि हे पुरावे केव्हाही दुय्यम प्रतीचेच ठरतात. भारतीय संस्कृतीचा आरंभकाल शतकांनी किंवा सहस्त्रांनीहि गणणे अशक्य झाले आहे. अशा स्थितीत बापापासून मुलाला आणि गुरुपासून शिष्याला मिळत आलेलें परंपरागतज्ञान निर्भेळ, शुद्ध अतएव विश्वसनीय असेल अशी कल्पनाही करवत नाहीं. इतक्या प्राचीन कालाच्या परंपरागतज्ञानांतही परिपूर्णता आणि सुसंगतता हे गुण थोडेच असणार आहेत ! सुसगंतपणा हा तर ऐतिहासिक पुराव्यांचा एक गुणच समजला जातो. सुसंगतपणामुळे मिळालेले पुरावे बनावट किंवा कायमठशाचे ( २ )