________________
भगवान महावीर व महात्मा बुद्ध.
प्रकरण दहावे. भगवान महावीर व महात्मा बुद्ध.
- ::बौद्धधर्माचे प्रवर्तक म. गौतमबुद्ध हे भगवान महावीर तीर्थकरांचे समकालीन होत. त्यांचा काळ इ. स. पू. ६२३ ते. इ. स. पू. ५४३ असा एकमताने आतां ठरला आहे. भगवान महावीरांचा काल जुन्या मताप्रमाणे इ. स. पू. ५९९ ते इ. स. प. ५२७ व आम्ही मागील एका प्रकरणांत आधारपूर्वक सिद्ध केल्याप्रमाणे इ. स. पू. ६१७ ते इ. स. पू. ५४५ ठरतो. कोणताहि काल धरला तरी म. बुद्ध भगवान महावीरांचे समकालीनच ठरतात. तेव्हां भगवान महावीर व म. वुद्ध या दोघांचा सर्व दृष्टीने तुलनात्मक विचार करणे अवश्य आहे. या बाबतींत गैरसमज इतका माजलेला होता की, पाश्चिमात्य संशोधक दोन्ही विभूतींना एकच समजू लागले होते; पण वैदिक ग्रंथांतून दोन्ही व्यक्तींचा व त्यांच्या उपदेशाचा स्वतंत्र उल्लेख असलेला पाहून पाश्चात्य विद्वान या दोन विभूति भिन्न आहेत असे मानूं लागले. पण जैनधर्म बौद्धधर्मातून निघाला असे विपरीत मत प्रतिपादूं लागले. पौर्वात्य विद्वान वैदिकधर्मीतूनच बौद्ध व जैन धर्म फुटून निघाले असेहि मानतात. जैनधर्माचे प्राचीनत्व आम्ही प्रारंर्भाच्या प्रकरणांत सिद्ध केलेच आहे. आतां जैनधर्माचा परिणाम बौद्धधर्मावर कितपत झाला आहे तें या प्रकरणांत दोन विभूतींची तुलना करतांना पाहूं.
बुद्धापूर्वी जैनधर्म होता याबद्दल वादच नाही; पण बुद्धाचे घराणे जैनधर्मी होते असे आतां सिद्ध झाले आहे. ललितविस्तार नांवाच्या बौद्धग्रंथांत बुद्धाच्या गळयांत बालपणी श्रीवत्स, स्वस्तिक व नंद्यावर्त ही चिन्हें व वर्धमान हे नांव अडकविले होते असे लिहिले आहे. पहिली तीन चिन्हें अनुक्रमें शीतलनाथ, सुपार्श्वनाथ व अर्हनाथ या तीर्थकरांची लक्षणे आहेत. चोवीसावे तीर्थकर मजून जन्मावयाचे असल्यामुळे त्यांचे लांछन गळ्यांत न बांधतां शुभनामच गळ्यांत बांधले असले पाहिजे हे उघड आहे. शिवाय स्वतः बुद्धांनीहि म्हटले आहे की मी चोवीस बुद्ध पाहिले आहेत. बुद्धापूर्वी बौद्धधर्मच नसल्यामुळे वरीलप्रमाणे त्यांनी र्थिकरानांच उद्देशन म्हटले असले पाहिजे हे उघड आहे. तीर्थकर होण्यास पूर्वजन्मांतून ज्या षोडश भावना व्हाव्या लागतात त्या मार्गाल एका