________________
महावीरचरित्र
वैश्यकुमार मानला गेला असून वीणावादनाचा स्वयंवरांतील पण जिंकल्यामुळेंच त्याला क्षात्रकन्येनें वरलें होतें. राजपुरीत सुरमंजरी व गुणमाला अशा दोन क्षात्रकुमारी होत्या. त्यांना हत्तीच्या तावर्डीतून सोडवून जीवदान दिल्यामुळे मातापित्यांनी त्या दोघी जीवंधरला अर्पण केल्या. पण हा हत्ती होता काष्टागाराचा. त्यानें हत्तीला जखम करणाऱ्याचे शीर तोडण्याचा हुकूम केला. त्याप्रमाणें जीवंवराला वधस्तंभाकडे नेण्यांतहि आले. पण यक्षाच्या साहाय्यानें जीवंधर जिवंत राहिला व चंद्रोदय पर्वतावर गेला. चंद्राभा नगरीचा राजा धनपति यानें आपली पुत्री पद्मा जीवंवराला दिली. कारण त्याने तिला चावलेल्या सापाचे विष उतरून जीवदान दिलें होतें. तेथून जीवंधर क्षेमपुरी नगरीला गेले व ज्योतिष बरोबर जुळल्यामुळे तेथील राजाने आपली पुत्री क्षेमश्री जीवधराला दिली. तेथून जीवंधर हे माभा नगरीला गेले. तेथील राजपुत्रांना त्यानें धनुर्विद्या शिकविल्यामुळे राजा दृदृमित्राने आपली कन्या कनकमाला जीवधराला दिली. येथें गंधोत्कट शेटचे पुत्र नंदाढ्य व पद्मास्य त्याला भेटले. तेथून जीवंधर परत राजपुरीला आले. सागरदत्त शेठनें आपली मुलगी विमला त्यांना दिली. धरणीतिलका नगरीच्या राजाने लावलेल्या स्वयंवरांत चंद्रकयंत्राचें तीन वराह छेदून जीवंवराने लक्ष्मणा राजकन्येशी विवाह केला. शेवटी काष्टांगाराचा खून करून जीवंधराने वडिलोपार्जित राज्यदि परत मिळविलें. विजयाराणीला तापसाश्रमांतून आणण्यांत आले. पण तिनें कांहीं दिवसांनंतर आर्थि केची दीक्षा घेतली. जीवंधरहि एकदां आपल्या आठ राण्यांशी क्रीडा करीत असतां वैराग्य उत्पन्न होऊन सत्यंधरावर राज्यकारभार सोपवून महावीर तीर्थकरांच्या समवसरणति आले व दीक्षा घेऊन महान तप केलें. आणि शेवटीं त्यांनी मोक्षहि प्राप्त करून घेतला.
((.८८ )