________________
सन्मति - तीर्थ
वाचण्यात आलेल्या लघुनिबंधांपैकी काही विषय येथे देत आहे. विषयातील विविधतेची कल्पना त्यावरून आपण करू शकतो.
१. भक्तामर स्तोत्राच्या लोकप्रियतेची कारणे.
२.
भक्तामरातील आठ भये : आधुनिक संदर्भात अर्थ.
३.
भक्तामरात उल्लेखलेले पशु, पक्षी, जलचर त्यांची वैशिष्ट्ये.
४. मानतुंगसूरींचे काव्यप्रभुत्व, शब्दसंपदा, अलंकारकौशल्य, उत्कट भाव.
५.
भक्तामरातील पाच उत्कृष्ट उपमा.
तीर्थंकरांची आठ प्रतिहार्ये, चार प्रतिहार्यातील भावरम्यता.
तीर्थंकरमातांचा गौरव करणारा श्लोक.
आदिनाथांमध्ये कोणकोणत्या देवता निवास करतात ? कोणत्या अर्थाने ?
६.
७.
८.
-
९. आदिनाथांचे दीपकापेक्षा श्रेष्ठत्व.
१०. आदिनाथांचे चंद्रापेक्षा श्रेष्ठत्व.
११. आदिनाथांचे सूर्यापेक्षा श्रेष्ठत्व.
१२. मानतुंग आचार्यांची विनयशीलता आणि आत्मविश्वास.
१३. भक्तामर स्तोत्राच्या रचनेमागची कथा.
१४. देवांपेक्षा वीतराग जिनांची श्रेष्ठता.
१५. जैन तत्त्वज्ञानात स्तवन, स्तुति, स्तोत्रांचे कथन.
१६. तीर्थंकरांच्या ३४ अतिशयांपैकी कशाकशाचे वर्णन या स्तोत्रात आहे ?
१७. भक्तामराच्या अंतिम श्लोकातील फलश्रुतीचे मुख्य दोन अर्थ.
१८. भक्तामराचा अर्थ का समजून घेतला पाहिजे ?
सर्व सहभागींनी विचारपूर्वक आपापल्या विषयाची निवड केली होती. २
सन्मति - तीर्थ
३ विषयांची पुनरावृत्ती झाली. कित्येकांनी असे निबंधवाचन प्रथमच केले. ३-४ जणांनी अतिशय शैलीदारपणे आणि अचूक शब्दात विषय मांडला. बौद्धिक आणि भावभक्तिमय आनंदाचा हा एकत्रित अनुभव खरोखरच आगळावेगळा होता. आनंदाच्या अशा अनेक ठेव्यांनी जैन साहित्याचा खजिना भरलेला आहे.
साहित्य आणि तत्त्वज्ञानाची अशी गोडी समाजाला लागली तर जैन अध्यासनाचे उद्दिष्टही हळूहळू पूर्ण होईल !!!
६४