________________
एक-बहु-अनेक-वचनावरून संस्कृतही यायला हवे प्रवचन प्रभावनेने होईल सम्यक् दर्शनाचीच आराधना यापेक्षा दुसरे काय हवे ॥४॥
नैसर्गिक घटनांचे दैवतीकरण म्हणजेच लोकमूढता 'हे शुभ', 'हे अशुभ', हवी कशाला मान्यता ? जिनेश्वरांचा आदर्श समोर ठेवूनच
केले आहे भाषेविषयीचे मार्गदर्शन
निरवद्य वाणीविषयीचे तेच
मला उमगलेले भासाजायज्झयण ।। ५ ।।
शुद्ध संस्कारित, मधुरवाणी, प्रयत्नपूर्वक बोलत राहिल्याने
संस्कारच होतात असे
प्रिय आणि हितकारक असेच शब्द
बाहेर पडतात जसे
अशा प्रकारच्या भाषाशुद्धीचे संस्कार
हृदयात दृढ होवोत
गोड बोलण्याचा संदेश घेऊन येणारी संक्रांत
आणखीच गोड होवो || ६ ||
७६