________________
भाषेच्या माध्यमातूनच व्यक्त करता येतात अंत:करणातील भाव,
या विषयीचेच मार्गदर्शन, ‘भाषाजात' त्याचे नाव... मर्माघाती, कठोर, कर्कश, सावद्यानुमोदी, कषाययुक्त कितीतरी भाषेचेच प्रकार दैनंदिन जीवनातही बोलण्याचे प्रसंग येतात वारंवार पण प्रयत्नपूर्वक अशा भाषेचा, करायलाच हवा त्याग तेच तर सांगते भाषाजात ।।१।।
शब्द हे शस्त्र आहे, जपूनच वापर करायला हवा धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे ते मागे घेता येत नाहीत पुन्हा भरूनही येतात तलवारीचे घाव दुर्वचनाचे काटे मात्र करतात सरळ मनावरच घाव मधुर, परिमित, परहितकारी असावी अशी वाणी
विवेकयुक्त वाणीची भाषेला जोड हवी ।।२।। "जं उप्पलस्स पत्तेण छिज्जए किं सत्थमग्गेण महुरम्मि भाणियव्वे किं ते कडुएण भणिएण' शारीरिक व्यंग, जातिवाचक, प्राणिवाचक एकेरी संबोधनाने नको बोलावण्याची प्रवृत्ति आंधळ्यालाही सूरदास म्हणणे ही तर आपली संस्कृति ।।३।।
प्रभावी वक्तव्यासाठी शुद्ध भाषा यायलाच हवी लिंग, वचन, विभक्ति व्याकरणासह शिकायलाच हवी
७५