________________
(३) काव्यातून भाषाजात
- ललिता ओसवाल
शब्द संभाल के बोल रे, शब्द को हाथ ना पाव रे ।
एक शब्द औषध करे, एक शब्द करे घाव रे ।। जनमानसात आपले विचार, धर्म, संस्कार पोहोचविण्याचे मुख्य साधन आहे भाषा. ती संयमित, मर्यादित व विवेकपूर्ण असावी असे आचारांगास अपेक्षित आहे.
क्रोध-मान-माया-लोभ ह्याने मुक्त असावे वचन
निश्चयकारी व विनयाचे असावे प्रयोजन ।। एकवचन-बहुवचन परोक्ष प्रत्यक्षाचे ठरवावे स्थान
सत्य-असत्य भाषेचे विसरू नये भान ।।
कर्कश निष्ठुर भाषेचे करू नये उच्चारण हे कामवाली, ए नोकर, ए झाडुवाला, ए वेटर
अशा हलक्या शब्दांचा नका करू वापर बिघडतात सारे व्यवहार, मनात होतो अनादर ।।
स्त्रियांना करावे आदराने संबोधन 'लंगडा', 'काळा', 'आंधळा' असे म्हणून होऊ नये क्रोधाचे कारण ।।
ज्ञानावरणीय कर्माचा क्षय म्हणून मिळाले भाषेचे वरदान म्हणून शब्द वापरा अहिंसेचे किंवा मग पाळावे मौन ।।
बगीचातही वृक्षवेलींप्रती असू द्यावा दयाभाव नुसत्या शब्दांनी सुद्धा जाणवतात त्या निष्पापांना घाव ।।