________________
आजच्या काळात दुसऱ्यांबद्दल माणूस किती विचार करतो ? पदोपदी तो दुसऱ्यांना दुखावत असतो. अशा परिस्थितीत, एकेंद्रिय जीव आपल्यावर उपकार करत आहेत, त्यांच्याशिवाय आपले जगणेच अशक्य आहे आणि म्हणूनच निदान त्यांचा वापर तरी आपण कमी व सावधानीपूर्वक करावा, असे मार्गदर्शन आचारांगातून नक्कीच आपल्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचते.
आत्मसाक्षात्कार करायचा तर कामना-वासना-इच्छा-आसक्ती इ.शी युद्ध करायला पाहिजे. या कर्मशरीराच्या वृत्ती असून त्या त्यागाव्यात. वेळोवेळी आत्मतुला करावी. भ. महावीर आत्मौपम्यभावाचे प्ररूपक होते. आहार, शय्या, भाषा, ईर्या इ. क्रिया करताना एकेंद्रियांपासून पंचेंद्रिय जीवांची यतना करावी, विवेक बाळगावा. पूर्ण आचारांगात कर्मक्षयाचे जे उपदेश दिले आहेत, त्याचेच अंतिम फळ म्हणजे 'मोक्ष' होय. ___शरीर अनित्य, अशाश्वत, अध्रुव, विकारी, विध्वंस होणारे, चयापचयाने कमी-अधिक होणारे असे आहे. बदलता पर्याय हा शरीराचा धर्म असून रोगव्याधी शरीरालाच होतात, आत्म्याला नाही. २६०० वर्षांपूर्वी सांगितलेले हे आत्मचिंतन, आत्मतत्त्व आजही तेवढेच सत्य आहे. कर्मनिर्जरेचे सांगितलेले उपाय आजही तेवढेच खरे आहेत. परंतु ग्रंथातून दिलेल्या मार्गदर्शनानुसार प्रत्यक्ष आचरण तितकेच आवश्यक आहे. तरच तो आत्मा पराक्रमी व पारगामी होऊ शकतो. खरोखरच आत्मजिज्ञासेपासून आत्मदर्शन येथेच मिळू शकते.
४३