________________
(८८७)
श्वास-उच्छवासप्रमाणे सूक्ष्म क्रियाच बाकी राहते.
४) समुछिन्न क्रियानिवृत्ति - जेव्हा शरीराच्या सूक्ष्म क्रिया सुद्धा बन्द होऊन जातात आणि आत्मप्रदेश पूर्णपणे निष्प्रकंप होऊन जातात, त्यास समुच्छिन्न क्रिया निवृत्ती ध्यान म्हणतात. याने सर्व आग्नव आणि बंधाचा निरोध करून बाकी राहिलेले कर्म क्षीण झाल्यामळे मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या व चवथ्या शुक्लध्यानात कोणत्याही प्रकारचे आलंबन
रहात नाही.३९८
शुक्लध्यानाच्या चार अनुप्रेक्षा आहेत. १) अनन्तवर्तितानुप्रेक्षा - अनन्त भव-परंपराविषयी चिंतन करणे ही संसारानुप्रेक्षा
आहे.
२) विपरिणामानुप्रेक्षा - वस्तू परिवर्तनशील आहे असा विचार करून त्याची आसक्ती आणि राग द्वोष कमी करणे. । ३) अशुभानुप्रेक्षा - संसाराच्या अशुभ स्वरूपाचे चिंतन करणे.
४) अपायानुप्रेक्षा - क्रोध वगैरे दोष आणि त्याच्या कटुफलाबद्दल चिंतन करणे.३९९ ध्यानसाधनेचे मुख्य तत्त्व समता आहे. मन जितके समभावी बनेल तितके ते स्थिर बनेल. समभावाशिवाय ध्यान होऊच शकत नाही. वास्तविक मनाची स्थिरता, समाधी खऱ्या अर्थाने तप आहे.
व्युत्सर्ग तप - आभ्यंतर तपापैकी सहावे तप व्युत्सर्गतप आहे. योगशाखात याचा पाचवा नंबर आहे. परंतु उत्तराध्ययन सूत्रात याचा अंतिम आभ्यंतर तपाच्या रूपात उल्लेख आहे.
व्युत्सर्ग हा सामाजिक शब्द आहे. यात 'वि' आणि 'उत्सर्ग' हे दोन शब्द आहेत. 'वि' म्हणजे विशिष्ट आणि उत्सर्ग म्हणजे त्याग, त्याग करण्याची विशिष्ट पद्धती म्हणजे व्युत्सर्ग.
बाह्य आणि आभ्यंतर उपाधीचा त्याग असे व्युत्सर्ग तपाचे दोन भेद आहेत.१००
१) धन, धान्य, घर, क्षेत्र इ. बाह्य पदार्थांची ममता ज्याचा त्याग करणे बायोपधी व्युत्सर्ग होय.
२) शरीराच्या ममतेचा त्याग करणे व कापयिक विकारांच्या तन्मयतेचा त्याग करणे म्हणजे आभ्यन्तरोपधी व्युत्सर्ग होय.