________________
(४८५)
अट्ट रुददाणि वजिता झाएज्जा सुसमाहिए
धम सुक्काई झाणाई झाणंतंतु बुहा वए ॥३९१ समाधी व शांतीची इच्छा असणाऱ्यानी आर्त व रौद्र ध्यानाचा त्याग करायला पाहिजे व धर्मध्यान, शुक्लध्यानाचे चिंतन करायला पाहिजे.
धर्मध्यान - आज्ञाविचय, अपायविचय, विपायविचय, आणि संस्थानविचय हे चार धर्मध्यान आहेत. जो अप्रमत्त संयमीमध्ये संभव आहे. तसेच उपशांत मोह आणि क्षीण मोहगुणास्थानात सुद्धा संभव आहे.३९२
१) आज्ञाविचय - विचय म्हणजे विचार करणे, निर्णय घेणे. वीतराग तथा सर्वज्ञ पुरुषांची आज्ञा काय आहे, कशी आहे. हे जाणून घेऊन त्या आज्ञेचे पालन करण्यासाठी मनोयोग लावणे. आज्ञाविचय धर्मध्यान आहे.
२) अपायविचय - दोषांचे स्वरूप आणि त्यापासून सुटका मिळविण्यासाठी जो विचार करायचा त्यासाठी मनाचा योग लावायचा असा हा अपायविचय धर्मध्यान आहे.
३) विपाक विचय - ज्या विपाकांचा अनुभव आला तो कोण-कोणत्या विपाकाचा कोण-कोणत्या कर्माचा आभारी आहे, तसेच अमुक कर्माचा अमुक विपाक संभव आहे अशा विचारासाठी मनोयोग लावणे विपाकविचय धर्मध्यान आहे.
४) संस्थानविचय - लोकस्वरूपाचा विचार करण्यात मनोयोग लावणे संस्थानविचय धर्मध्यान आहे.३९३
धर्मध्यानाचे चार लक्षण आहेत. १) आज्ञारुची - अर्थात् जिनेश्वर देवाच्या आणि सद्गुरुच्या आज्ञेवर विश्वास ठेवून आचरण करणे.
२) निसर्गरूची - धर्मावर, सर्वज्ञभाषित तत्त्वांवर आणि सत्यदर्शनावर जर आपल्या हृदयात सहज श्रद्धा जागृत झाली तर ती श्रद्धा, ती रूची निसर्गरुची आहे.
३) सूत्ररुची - सूत्र म्हणजे भगवत्वाणी अर्थात आगम अंग उपांगादिरूप सूत्र, ते ऐकून धर्माबद्दल जी रूची जागृत होते ती सूत्ररुची होय.
४) अवगाढ रूची - अवगाहन म्हणजे खोल-गहन चिंतन करणे, ज्यांची आगम वचनावर गाढ चिंतन, मनन करण्याची. अवगाहन करण्याची रुची असते, ती उत्सुकता, अवगाढरूची होय.३९४