________________
ARVARIOMearATES5HRSTRETHORS
नई उपसून काढले किंवा सूर्याच्या प्रखर उन्हाने ते सुकले तर तलाव रिकामा होईल. याचप्रमाणे संवराने ज्यांनी येणाऱ्या कर्मांना रोकले आहे असा संयमी करोडो भवांचे संचित कर्मांना तपाने नष्ट करतो.३४३
संवर चौकीदारा (watch man) सारखा आहे. तो बाहेरून येणाऱ्या कर्मानवांना आत्म्यात घुसू देत नाही. परंतु आत्म्याचे आस्तित्व भूतकाळात होते. वर्तमानात आहे आणि भविष्यातही असणार आहे. अनादीअनंत काळापासून आत्मा कर्मांनी व्याप्त आहे. खाणीमध्ये ज्याप्रमाणे सोने मातीत मिसळलेले असते मग तापवून तापवून माती जाते मग खरे सोने उरते. तसेच अनादि काळापासून आत्मा संसारात राग-द्वेषाच्या अधीन होऊन कर्माना ग्रहण करतो. ते सोडविण्यासाठी निर्जरा हाच एकमात्र उपाय आहे. अगर कर्माच्या ओझ्याखाली दबलेला आत्मा त्याला शुद्ध व हलके कसे करावे ? असे चिंतन करून त्याप्रमाणे प्रयत्न करणे म्हणजे निर्जरा भावना आहे.
- आचार्य कुंदकुंद्र यांनी “वारसाणुवेक्खा''मध्ये ६६ आणि ६७ या दोन गाथामध्ये निर्जरा भावनेचे वर्णन केले आहे की, आत्म्यावर कर्मप्रदेशांनी जे आवरण आणले आहे किंवा आत्मप्रदेश हे कर्मप्रदेशांनी झाकून टाकले आहेत, त्या कर्मप्रदेशांना ओगळून टाकायचे, म्हणजेच निर्जरण करायचे. त्यालाच निर्जरा म्हणतात. असे जिनेश्वर देवानींच प्रतिपादित केले आहे. ज्या कारणामुळे संवर होतो त्याच कारणामुळे निर्जरा होते. हे आपल्याला समजले पाहिजे.३४४
स्था कर्मप्रदेशांची आत्मप्रदेशांशी जी एकरूपता झालेली आहे त्यांना वेगळे करायचे म्हणजे कर्माचे निर्जरण करायचे आहे. ज्याप्रमाणे भिंतीवर मातीचा गोळा फेकला, तो सुकला तर काढताना सहज निघत नाही. त्याचप्रमाणे आत्मा आणि पूदगलांचे प्रदेश चिकटले जातात. त्या आत्मप्रदेशांशी चिकटलेल्या कर्म प्रदेशांना हटविणे निर्जरा आहे.
संवर आग्नवाचा निरोध आहे. मानसिक, वाचिक, कायिक प्रवृत्तींना रोकणे संवर आहे. निर्जरा पूर्व संचित कर्मांचे आत्म्यापासून विलय होणे आहे. दोन्हींचे स्वरूप भिन्नभिन्न आहे. आचार्य कुंदकुदांचाऱ्यांनी ज्या कारणामुळे संवर होतो त्याच कारणामुळे निर्जरा होते असे प्रतिपादन केले आहे. संवराने आत्मोन्मुखी प्रवृत्ती होते. पर भावापासून स्वभावाकडे वळण्याचा आंतरिक पुरुषार्थ जागृत होतो. त्याच्याने कर्म निर्जरा होते. अशाप्रकारे संवर आणि निर्जरा यात ऐक्य, समन्वय सिद्ध होते. नवीन येणारे कर्म थांबते. साचत कर्म झडते म्हणजे निर्जरा होते. अवरोध आणि पृथक्करण अथवा निर्जरण दोन्हीचे