________________
समजावन घेऊन आम्रवद्वाराना अडवण्यासाठी चिंतन करण्याची प्रेरणा मिळते तर काही लेखकांनी भेद-विज्ञानाचे विश्लेषण द्वारा षद्रव्यमय संपूर्ण लोकाचे स्व-पर या दोन विभागात विभक्त करून 'स्व'मध्ये स्थित राहण्याची प्रेरणा दिली आहे
संपूर्ण जगाला स्व आणि पर याने विभाजित केल्याने 'पर' पासून विमुख होऊन बसन्मख होणे हीच आत्मानुभूती आहे. संवर आहे. संवर भावना आहे. संवर भावनेचे फळ आहे.
- आनवद्वार बंद झाल्यावर जीवात्म्यात स्थिरता येते. हृदय स्वच्छ होते. म्हणून सतत चिंतन करावे की, "आता मी मनात कोणत्याही प्रकारच्या पापयुक्त विचारांना प्रवेश देणार नाही. जितकी आस्रव द्वारे आहेत ती सर्व बंद करण्याचा प्रयत्न करीन. संवरयुक्त धर्माचा आश्रय होईन. राग-द्वेषाचा कोणताही विचार येणार नाही यासाठी प्रत्येक क्षण जागृत राहीन. अशा प्रकारचे चिंतन केल्याने मृत्यूच्या वेळेपर्यंत जागृती राहते. संबर भावनेचा अभ्यास चिंतन, मनन आणि प्रयोग जीवनात निरंतर चालू ठेवल्याने संवर भावना सतत करीत राहिल्यामुळे सहजपणे समिति-गुप्ती इ. पालन करण्याचे विचार येतील. विचार-आचारात परिवर्तित होईल. व ज्ञानक्रियेच्या योगाने मुक्ती नक्की मिळेल.
म्हणून सर्व मुमुक्षू जीवांनी संवर भावना रूपी ज्ञान-गंगेत आकंठ मग्न होऊन आत्मिक आनन्द प्राप्त करावा.
निर्जरा भावना जैनदर्शनाची समस्त साधना पद्धती संक्षेपात सांगायची म्हटले तर फक्त दोन शब्दात अभिव्यक्त करू शकतो. ते दोन शब्द आहेत. संवर आणि निर्जरा हे दोन्ही उपादेय धर्म आहेत. अर्थात आचरण करण्यायोग्य आहे. हे दोन्ही बरोबर राहतात. अगोदर संवर नंतर निर्जरा. संवर म्हणजे येणाऱ्या कर्मानवांना येण्यास प्रतिबंध करणे, आणि निर्जरा म्हणजे पूर्वी संचित केलेल्या पापकर्माचा क्षय करण्याची क्रिया. संवर करणारा निर्जरा करेलच असे नाही. परंतु निर्जरा करणारा संवराचे आचरण निश्चित करणारच. कारण संवराने आत्म्यात नवीन कर्मांचे आगमन थांबते. परंतु संचित कर्म तर तसेच राहतात. जोपर्यंत पूर्वी अनंत जन्मात बरोबर घेऊन आलेले जे कर्म आहे ते संपत नाही तोपर्यंत मोक्ष नाही. याचे आगमात सुंदर उदा. दिले आहे.
मोठा तलाव पाण्याने गच्च भरलेला आहे त्यात नवीन पाणी आत येण्याचे सगळे माग बद करून टाकलेत पण तलाव पाण्याने तर भरलेला आहे. त्यातील पाणी सर्वच्या