________________
overRRORIYARACTRAHASYAME
मोहरीच्या दाण्याइतके कमी समजतो. अशा विचारप्रवृत्तीमुळे त्याचा उद्धार होत नाही. मद, अहंकार, अभिमान, सर्व दुर्गुणांची खाण आहे. म्हणूनच मद आणि मदिरा एका जातीचे मानले जातात.
२) विषय - शब्द, रूप, गंध, रस व स्पर्श या पाच इन्द्रियांच्या विषयात मशगूल होणे.
यांचा उपयोग जर गुणी लोकांचे गुणगाण करण्यात, संतदर्शन, तप, इत्यादी सत्कार्यात न लावता बीभत्स शब्दोच्चारण, रूप अवलोकन गंध, ग्रहण, अभक्ष्य भक्षण आणि भोग-विलासासाठी केला तर त्याचा जन्मच वाया गेला. लोक-परलोक दोन्हीमध्ये भयंकर दुःखाशिवाय काही मिळणार नाही. म्हणूनच तर विषयाला विष म्हटले आहे.
३) कषाय - प्रमादातच कषायाचा अन्तर्भाव केला आहे. आग्नवाचे मुख्य पाच द्वार, त्यात सुद्धा कषाय आहेच. म्हणून इथे संक्षिप्त मध्य इतकेच सांगते की रागद्वेषाच्या उन्मादात उन्मत्त होणे म्हणजे कषाय आहे. कपायचे विस्तृत वर्णन अशुभ भावनेच्या प्रकरणातच झाले आहे.
४) निंदा किंवा निद्रा - प्राकृत शब्द “निदा'चा निंद्रा आणि निंदा दोन्ही अर्थ घेऊन विवेचन केले जाते. पं. रत्नचंद्रजी महाराजांनी निद्रेचा अर्थ आळस, सुस्त पडून राहणे केला आहे. हा सुद्धा प्रमाद आहे.
शास्त्रोद्धारक पूज्य अमोलकबरपीजी महाराजांनी निद्रा आणि निंदा दोन्ही प्रमादाचे कारण म्हटले आहे. म्हणून दोन्ही अर्थ घेऊ शकतो. जित दशवैकालिक सूत्रात "पिट्ठिमंसं न खाइज्जा ।" अर्थात कोणाची ही त्याच्या अनुपस्थित निंदा करू नये. अशा प्रकारची निंदा करणे म्हणजे मांस भक्षण करण्यासारखे आहे. निंदा करणारा त्या व्यक्तीमध्ये असलेल्या अन्य गुणांना झाकण्याचा प्रयत्न करतो. दोष नसताना त्याच्यात दोषारोपण करतो. भोळ-भाबड्या लोकांची कोणाबद्दल भक्ती असेल तर आपल्या कुतर्काने खोटी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. पूज्य अमोलकत्ररुपीजी म. नी. निंदा वर सवैया केली त्यात स्पष्ट शब्दात लिहितात -
नरक निगोद भमे निंदा का करणहार, चंडाल समान जिसकी संगति नहीं काम की । आप की बडाई. पर हानि में मगन मूढ ।