________________
SH
(४३२)
प्रत्याख्यान (व्रत) करीत नाही, व पृथ्वी इ. षष्टकाय संबंधी आरम्भ समारम्भ करतो ही अवतीची अवस्था आहे. व्रत नियम, प्रतिबंध जो पर्यंत केले जात नाहीत तो पर्यंत निरन्तर कर्मबंध होत राहतात.
चिंतनातून असे स्पष्ट प्रतीत होते की भोजन, आभूषण, वस्त्र, घर इत्यादी सामग्री मिळविण्यासाठी किती पापांचे पूंज गोळा करावे लागतात. ह्या पापांच्या पुंजाचा विचार करताना हृदय रोमांचित होते. विचारांच्या प्रवाहाने मस्तक चक्रावून जाते की हा संसार किती भयंकर पापांनी भरलेला आहे. सांसारिक प्रत्येक कार्यात जुलूम निर्दयता दिसून येते. सांसारिक कित्येक पाप ज्ञात अवस्थेत आहेत तर कित्येक महाघोर पाप आपल्या अज्ञात अवस्थेत उत्पन्न होत आहेत. आपण मयदित म्हणजे व्रत प्रत्याख्यानात नसल्यामळे त्या सर्व पापक्रिया आत्म्यात येत राहतात. ज्याप्रमाणे घराचे दार जर बंद केले नसेल तर उघड्या दारातून धूळ, कचरा येतच राहिल मग आपली इच्छा असो वा नसो, दार उघडे आहे मग धूळ कचरा येण्यास आपण प्रतिबंध कसे करणार ? त्याचप्रमाणे आत्म्याचा दरवाजा व्रत, नियम, प्रत्याख्यान याने बंद केला नाही तर कर्मरूपी कचरा आत प्रवेश करीतच राहणार. पापसमूह आत्म्याकडे आकर्षित होतच राहणार. म्हणून मुमुक्षुजीवांनी चिंतनशील बनावे व अवतापासून दूर रहावे. पाच प्रमाद
See
'भेद - विसय - कसाय - निद्रा. विकहा या पंचमा भणिया ।
एए पंच पमाया, जीवा पाडंति संसारे ।। मद, विषय, कषाय, निद्रा, विकथा हे पाच प्रकारचे प्रमाद आहेत. हेच जीवाला संसारात बुडवत राहतात. ज्याप्रमाणे खिडकीतून हवा घरात येते. नाल्याचे पाणी तलावात येते, घशाच्या द्वारे अन्न पाणी जठरात जाते, त्याचप्रमाणे मद, विषय, कषाय, निद्रा आणि विकथा रूपी प्रमादांच्या द्वारे कर्माचा प्रवाह निरंतर आत्म्यात येत राहतो. कर्मांना आत्म्यात प्रवेश करू द्यायचा नसेल तर मुमुक्षुजीवांनी प्रमादाचे द्वार बंद करायला पाहिजे.
१) मद - जाती, कुळ, बळ, रूप, शास्त्र (ज्ञान) लाभ तप आणि ऐश्वर्य या आठांचे स्वामित्व प्राप्त होताच अहंकार, मद यात वृद्धी होते. वरील आठ गुणांचा उपयोग सयम, व्रत, परोपकार इ. शुभ कार्यात न केल्यामुळे अहंकार पोसला जातो, परिणामस्वरूप दुर्गतीची प्राप्ती होते. अभिमान बाळगणाऱ्या व्यक्तीस आपल्यातील अगदी सामान्य गुण सुद्धा मरूपर्वताएवढा भासतो. व दुसऱ्यांच्या महान गुणांना तसेच आपल्यातील दुर्गुणांना