________________
(५०८)
दृष्टीक्षेपात जाणण्याची शक्ती असूनही तो अल्पज्ञच राहतो. हे सर्व कर्मावरणामुळे पुद्गलाची शक्ती जीवाच्या शक्तीला कुंठित करून टाकते. ज्याप्रमाणे एखादा गुंड सत्शील सदाचारी माणसाला दाबून टाकतो अगदी त्याचप्रमाणे या कर्माच्या व पुद्गलाच्या आवरणामुळे शक्ती असूनही शक्तीहीन बनून जातो.
अशाप्रकारे स्वामी कार्तिकेय यांनी लोकाचे खूप विशद वर्णन केले आहे. त्यात जीवासंबंधी अनेक तथ्य समोर येतात. विवेचन खूपच गंभीर आणि तात्त्विक आहे. लोकभावनेचे समीक्षण व लोकभावनेचा परिणाम
भ. महावीरांच्या वेळेचा एक प्रसंग आहे. शिवराजर्षी नावाचे तापस होते. तपाच्या प्रभावाने त्यांना विभंग ज्ञान प्राप्त झाले होते. मिथ्यादृष्टीचे अवधिज्ञान म्हणजे विभंगज्ञान होय. शिवराजर्षी आपल्या विभंगज्ञानाद्वारे सात द्वीप समुद्राला पाहू शकत होते. त्यांनी आपली धारणा करून टाकली की जेवढे माझ्या ज्ञानाने मी पाहू शकलो तेवढाच हा पृथ्वीमंडल आहे. आणि आपल्या धारणेचा त्यांनी जन सामान्यात प्रचारही सुरू करून
टाकला.
एकदा ते भिक्षा घेण्यासाठी नगरात गेले. त्यांनी लोकांकडून ऐकले की भ. महावीर तर असंख्य द्वीप आहेत, असंख्य समुद्र आहेत असे म्हणतात. शिवराजर्षी भ. महावीरांच्या समवसरणात गेले. भगवानांचे ते दिव्य भव्य व्यक्तिमत्व पाहताच त्यांचा अहंकार गळून गेला. त्यांचे विचार शुद्ध परमशुद्ध होऊ लागले. त्यांचे मिथ्याज्ञान सम्यक्त्वज्ञानात परिवर्तित झाले. त्यांचे विभंग ज्ञान, अवधिज्ञानात बदलले. त्यांच्या विचारात परम विशुद्धी आली. त्यांना सात द्वीप समुद्रापलीकडे अनेक द्वीप समुद्र दिसू लागले. हळूहळू त्यांना असंख्यात द्वीप समुद्र आपल्या अवधीज्ञानामुळे पाहता आले. ते भ, महावीरांचे शिष्य बनले. आणि शेवटी केवळज्ञान प्राप्त केले व मुक्तीगामी (मोक्ष) झाले.
सारांश हे की, लोक समीक्षण अथवा लोकभावना द्वारा शिवराजर्षीनी आत्म्याची परमोलच्धी प्राप्त केली. लोकभावनेच्या अनुचिंतनाने लोकातील अणु-अणूचे अनंतभूत, भविष्याशी संबंधित ज्ञान जागृत होते. ४२५
आगमामध्ये व विभिन्न ग्रंथामध्ये लोकाचे वर्णन आहे त्याने हे स्पष्ट होते की, ह्या लोकाचे, सर्जण कोणीही केलेले नाही. लोक केव्हापासून निर्मित आहे हे सांगणे, सिद्ध करणे अत्यंत कठीण आहे. कारण त्याचा कोणी निर्माता नाही. ते अनादी अनंत आहे. याचा अंत होईल ह्यात तथ्य नाही. या अनादी अनंत लोकात जीव कर्मावरणामुळे विभ्रांत