________________
(५०७)
पदार्थांशी संबंधित आहे. ज्याप्रमाणे शेतातील पीक पाणी, हवा, उष्णता इ. पदार्थाच्या संबंधामुळे पिकतात म्हणून ते मूर्त आहेत. ज्याप्रमाणे पायात काटा टोचला तर असातावेदनीय विपाक झाला समजावे तसेच गोड पकान्नाचे भोजन मिळाले तर सातावेदनीयाचा कर्म विपाक समजावा म्हणून कर्म सुद्धा पौदगलिक आहेत.
1
जीब सुद्धा एक दुसऱ्यावर परस्परांशी उपकार करतात. उदा. मालक नोकराला धन देऊन उपकार करतो. सेवक मालकाची सेवा करतो हितकारक कार्य करून मालकावर उपकार करतो. गुरू आपल्या उपदेशाने शिप्याचे जन्मजन्मांतर सुधारून उपकार करतात. पतिशिष्य गुरु आज्ञा पालन करतो. गुरूची सेवा सुश्रुषा करतो. अशाप्रकारे पिता-पुत्र, पत्नी, मित्र-मित्र परस्पर एकमेकांवर उपकार करतात. त्याचप्रमाणे जीव जीवावर अनुपकारही करतानाही तथा उपकारही करत नाही.
-
उपकार - अपकार करण्यातही पुन्हा मुख्य कारण शुभ-अशुभ कर्म आहे. जर जीवाच्या शुभ कर्माचा उदय असेल तर दुसरे जीव उपकार करतात किंवा तो स्वतः अन्य जीवावर उपकार करतो. जर अशुभ कर्माचा उदय पापकर्माचा उदय असेल तर दुसरे जीव त्याच्यावर उपकार करणार नाही किंवा तो दुसऱ्यांवर उपकार करणार नाही.
पुद्गल द्रव्यात अर्थात स्वर्ण, रजत, मणी, मुक्ता, धन, धान्य, भवन, शरीर, बी, पुत्र, मित्र इ. चेतन-अचेतन, अचेतन-चेतन पदार्थात अशी काही अपूर्व अदृश्य शक्ती आहे. ह्या पौद्गलिक शक्तीद्वारे जीवाचा केवलज्ञान रूप स्वभाव नष्ट होऊन जातो. अनादिकाळापासून हा जीव जन्ममरणाच्या चक्रात चक्रावलेला आहे. म्हणून जे प्रिय वाटते त्यावर राग (प्रेम) करतो आणि जी वस्तू अप्रिय वाटते त्यावर द्वेष करतो. या रागात्मक, द्वेषात्मक परिणामामुळे नवीन कर्माचे बंध होतात. ते कर्म, पौद्गलिक असतात. या कर्माच्या निमित्तामुळे जीवाला पुन्हा पुन्हा जन्म-मरण्याच्या चक्रव्यूहात अडकावे लागते. नवीन जन्म म्हणजे परत नवीन शरीर आलेच. शरीर म्हटले की इंद्रिये असणारच. त्या इंद्रियांच्या भावाप्रमाणे ते आपले विषय ग्रहण करणारच म्हणजे राग-द्वेषाची श्रृंखला सतत चालूच राहणार राग-द्वेष आले की कर्मबंध झालाच. कर्म बंध जसे असतील त्याप्रमाणे रागद्वेष आलेच. हे चक्र अविरत चालूच राहते. या कर्मबंधाखाली दबल्यामुळे जीव (आत्मा) आपल्या मूळ स्वाभाविक गुण व्यक्तच करू शकत नाहीं. म्हणजे स्वाभाविक दर्शन येतच नाही. कर्माचे आवरणच इतके बोझिल होतात की आत्मा (जीब) आपले डोके वर काढूच शकत नाही. ज्ञानगुण याचा झाकला जातो. परिणामस्वरूप समस्त द्रव्य पर्यायांना एका