________________
(20)
• द्रष्टपाची भूमिका थोडी सुद्धा बजावू शकत नाही. त्याने थोडा विचार केला पाहिजे की केवळ बाह्य दर्शनाने काय साध्य होईल ? काय अपरिमित भौतिक साधने त्याला शांती देऊ शकतील ? कधीच नाही. जे क्षणिक आहे, नाशवंत आहे ते जरी सुखदायक वाटल असले तरी तो केवळ सुखाभास आहे. खरे सुख अंतरात्म्यामध्ये आहे, जे शाश्वत आहे. अजर, अमर, अविनाशी आहे. परंतु दुःखाची गोष्ट अशी आहे की, मी कोण आहे ? कोऽहं ? हा सर्वात प्रथम, सोपा परंतु महत्त्वपूर्ण प्रश्न मनुष्याच्या मनामध्ये उठत नाही. विश्वदर्शनाचा जिज्ञासू आत्मदर्शन करणेच विसरला. उघड्या डोळ्यांनी ज्या देहाला तो पाहतो त्यालाच 'मी, मी' म्हणत राहतो. हा त्याचा सर्वात मोठा भ्रम आहे. ह्या खोट्या भ्रमासाठी कोण उत्तरदायी आहे ?
भौतिकतेच्या भीषण अंधकारामध्ये निमग्न मानवाला अध्यात्मरसाचा दिव्यप्रकाश देण्यासाठी आणि अज्ञानाच्या घोर निद्रेतून जागे होऊन आत्मविकासाच्या मार्गावर अग्रेसर होण्यासाठी ज्ञानी पुरुषांनी अनेक मार्ग दाखवले आहेत. त्यामध्ये भावना शुभ आणि शुद्ध ठेवणे हे सुद्धा एक आध्यात्मिक अनुष्ठान आहे.
"ज्या साधकाचा आत्मा भावनायोगाने विशुद्ध झाला आहे तो आत्मा पाण्यात स्थिर असलेल्या नौकेप्रमाणे संसारसागराला पार करून सर्व दु:खापासून मुक्त होऊन सुख प्राप्त करू शकतो. "२
किना-यावर पोहचलेली नाव ज्याप्रमाणे विश्राम करते त्याचप्रमाणे भावनायोगाची साधना करणारे साधक सुद्धा संसार सागराच्या किनाऱ्यावर पोहचून सर्व दु:खापासून मुक्त होतात. त्यांच्या आत्म्याला भवभ्रमणापासून शांती मिळते.
असा प्रश्न उद्भवतो की विचार अथवा चिंतनाचे भावोद्वेलन आणि भावना ह्यात काय फरक आहे. बाह्यरूपाने पाहिले तर ते सारखेच दिसतात परंतु सूक्ष्म दृष्टीने चिंतन केले तर भावनेचे काही विशेष तात्पर्य आहे. कोणत्याही एका तत्त्वावर, विषयावर अथवा पक्षावर निरंतर विचार करणे, ते मनात ठेवणे त्याच्याबरोबर सातत्याने संयुक्त राहणे म्हणजे भावना होय. विचारांचे जीवन घडविण्याच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. ते चिंतन आणि भावनेच्या रूपातच आहे. सद्विचार अथवा सुविचार किंवा चिंतन, मनन हेच भावनेचे रूप घेतात.
जोपर्यंत हे शरीर, मन आणि इंद्रिये आहेत तोपर्यंत जीवनामध्ये चंचलता विद्यमान असते. मनाची चंचलता अधिक असेल तर तो प्रत्येकवेळी काही ना काही विचार करतच