________________
lettes
प्रकरण २ रे भावना विचार आणि मन
S
भारतीय साहित्यामध्ये 'भावना' शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भावना मानवी जीवनाची अदभूत शक्ती आहे. हृदयातील लोकजगताला 'भाव लोकजगत' म्हटले आहे. दख, वेदना, व्यथा, सहानुभूती, प्रेम, रसास्वादन, संवेदन, आसक्ती विरक्ती, राग-वैराग्य, विनय, भक्ती हे हृदयाचे भाव आहेत. आत्म्याच्या पतनाचा अथवा उत्थानाचा आधार भावच आहे. म्हणूनच आचार्य श्री सिद्धसेन दिवाकर यांनी सांगितले आहे की. -
___यस्माक्रियाः प्रतिफलन्ति न भावशून्यः।।१।। साधनेचा प्राण भावना आहे. ज्या साधनेच्या आणि क्रियेच्या मागे भावना आहे, भवती आहे, हृदय आहे त्याच सफल होतात. अन्यथा भावशून्यतेने अथवा हदयशून्यतेने होणाऱ्या सर्व क्रिया व्यर्थ आहेत. ते केवळ अवडंबरच असते. त्याचे परिणामही विपरीत होतात. म्हणून साधकाची साधना भावयुक्त असली पाहिजे.
अंतरंगामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचार लहरी ज्या विशेष रूपाने स्फुरण पावलेल्या असतात त्यांना सुद्धा 'भावना' म्हटले जाते.
विचार हा जीवनाचा पाया आहे, पाया मजबूत नसेल तर मजबूत घर बनू शकत नाही. जीवनामध्ये विवेकयुक्त आचरण आणि भाव नसेल तर ते जीवन केवळ पशूसारखेच असत. तसे पाहिले तर मनुष्य विचारशील प्राणी आहे. नरकातले जीव दुःखी आणि दीन आहेत, स्वर्गातले जीव सुखामध्ये लीन आहेत, तिर्यंच पशुपक्षी इत्यादी विचारशून्य प्राणी आहेत. त्यांच्यामध्ये विचारशीलता, बुद्धी, भावना आणि विवेक यासारखी शक्ती नाही. एक मनुष्यप्राणीच असा आहे ज्याला विचारक्षमता, बुद्धीची प्रेरणा व योग्यता आहे. आजच्या ह्या विज्ञानयुगात तर मानवाची जिज्ञासा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तो ज काही पाहतो, ऐकतो त्या सगळ्यांचे रहस्य जाणण्यामध्ये आणि त्यांच्यातील भेद समजून घेण्यामध्ये इतका व्यस्त झाला आहे की तो स्वतःला विसरला आहे. आज मानव
वर पहिचून निरीक्षण करून आला आहे. परंतु किती आश्चर्याची गोष्ट आहे की तो पल्या आंतरीक भूमीचे निरीक्षण करू शकला नाही. तो बाह्यद्रष्टा बनला. परंतु आंतरीक
चंद्रावर