________________
(४२)
सर्व संमतीने आगम लिपीबद्ध केले गेले. हे कार्य 'वीर निर्वाण' सं. ९८० मध्ये झाले (वाचनान्तरानुसार वि. सं. ९९३ मध्ये झाले.)
जिनवाणीला ग्रंथबद्ध करण्याचे हे ऐतिहासिक कार्य वास्तविक आजच्या समग्र ज्ञानपिपासू जनतेसाठी एक अवर्णनीय उपकार आहे. आत्मज्ञानाची प्राचीन ज्ञानधारा प्रवाहित ठेवण्याचा हा उपक्रम वल्लभीच्या प्राचीन नगरीत संपन्न झाला. १६. आगमाचे अनुयोगामध्ये विभाजन
आचार्य आर्यरक्षितसूरींनी अंग, उपांग, छेद, मूल इ. आगमांचे विषय विश्लेषणाच्या दृष्टीने
१) चरणकरणानुयोग २) धर्मकथानुयोग ३) गणितानुयोग ४) द्रव्यानुयोग या रूपात चार विभाग केले आहे.
अनुयोग म्हणजे अर्थाबरोबर सूत्राची जी अनुकूल योजना केली जाते ती अथवा सूत्राचा आपल्या अभिधेयात जो व्यापार होतो त्याला अनुयोग म्हणतात. '
२९
१) चरणकरणानुयोग - यामध्ये आत्मविकासाचे मूळ गुण, आचारव्रत, ज्ञान, दर्शन, चारित्र्य, तप, संयम, सेवा (वैयावच्च ), ब्रह्मचर्य, कषाय निग्रह इत्यादी आणि उत्तरगुण पिण्डविशुद्धी, समिती, गुप्ती, भावना, प्रतिमा, अभिग्रह, इंद्रियनिग्रह, प्रतिलेखना इत्यादीचे विवेचन आहे.
चरणकरणानुयोगाच्या अंतर्गत आचारांग आणि प्रश्नव्याकरण ही दोन अंगसूत्रे, दशवैकालिक हे एक मूळ सूत्र, निशीथ, व्यवहार, बृहत्कल्प आणि दशाश्रुतस्कंध ही चार छेद सूत्रे आणि आवश्यक सूत्र अशा एकूण आठ सूत्रांचा समावेश होतो. ७०८ २) धर्मकथानुयोग यात कथा आख्यान, उपाख्यानांद्वारे धार्मिक सिद्धांताचे विवेचन केले आहे. तसेच दया, दान, क्षमा, आर्जव, मार्दव इ. धर्मांच्या अंगाचे विवेचन आहे.
ज्ञाता धर्मकथा, उपासकदशा, अन्तकृतदशा, अनुत्तरौपपातिक दशा आणि विपाक ही पाच अंगसूत्रे, औपपातिक राजप्रश्नीय, निरियावलीका, कल्पावतंसिका, पुष्पिका, पुष्पचूलिका आणि वृष्णीदशा ही सात उपांगसूत्रे, उत्तराध्ययन हे एक मूळ सूत्र अशाप्रकारे एकूण तेरा सूत्रांचा ह्यात समावेश होतो.
३) गणितानुयोग - यामध्ये भूगोल, खगोल इत्यादी विषयांचा आणि