________________
म्हटले आहे.
- जवळ जवळ ह्याचवेळी सौराष्ट्राच्या अंतर्गत वल्लभीमध्ये नागार्जुन सूरींच्या नेतृत्वातसुद्धा श्रमणांचे आगम संकलनाच्या हेतूने संमेलन झाले. असा प्रश्न उपस्थित होतो की एकाचवेळी दोन संमेलने का झाली ? ह्याचे कारण हे असावे की जैन साधू संपर्ण भारतात पसरले होते. सगळ्यांचे मथुरेपर्यंत पोहचणे शक्य नसेल कारण जैन साधू पादचारी असतात. म्हणून वल्लभीमध्ये सुद्धा वाचना झाली असेल असे वाटते. ह्या संमेलनात ज्या सूत्राचे विस्मरण झाले होते त्याचे उद्धरण केले गेले. विस्मृत स्थानी पूर्व संदर्भानुसार वाचना दिली गेली. ह्याचे नेतृत्व नागार्जुनांनी केले म्हणून ह्या वाचनेला "नागार्जुनिय वाचना' सुद्धा म्हणतात.
___उपरोक्त वाचनेला जवळजवळ दिडशे वर्षांपेक्षा जास्त काळ व्यतीत झाला होता. त्यावेळी वल्लभीमध्ये देवर्धिगणि क्षमाश्रमणच्या नेतृत्वात संमेलन बोलावले गेले. श्रमणसंघ एकत्रित झाला.
आगम संकलनाचा अंतिम प्रयत्न लिपीबद्धता - ह्या अंतिम वाचनेमध्ये बहुश्रुतज्ञ श्रमणांनी असे चिंतन केले की आता लोकांची स्मरणशक्ती इतकी चांगली राहिली नाही म्हणन आगम कंठस्थ ठेवणे कठीण आहे. त्यामळे विशाल ज्ञान सागराला स्मृतीत ठेवणे कठीणच वाटत आहे. आगमांचा त्यामुळे लोप होत आहे. महावीर निर्वाणांच्या हजार वर्षांपर्यंत आगमज्ञान श्रुती परंपरेच्या आधाराने होते परंतु त्यानंतर स्मृती दुर्बलता, गुरुपरंपरेचा विच्छेद, अनावृष्टिचा प्रभाव इत्यादी अनेक कारणामुळे आगम ज्ञानमहासागराचे जल कमी झाले.
श्रुतज्ञान निधीच्या संरक्षणासाठी महानश्रुतज्ञानी 'देवर्घिगणि क्षमा' श्रमणांच्या अद्यक्षतेमध्ये श्रमणसंघ एकत्रित झाला. पूर्वीच्या दोन्ही वाचनांच्या आधाराने आगमाचे संकलन करून त्यात वेगळेपणा म्हणजे पाठांतर आणि वाचनाभेद होते त्यांना व्यवस्थित करून दोन्ही वाचनांच्या सिद्धांताचा परस्पर समन्वय केला गेला. पाठभेद मिटवून एकरूप करण्याचा आटोकाय प्रयत्न केला गेला. जे महत्त्वपूर्ण होते ते पाठांतराच्या रूपात टीका, चूर्णिमध्ये संग्रहित केले. प्रकीर्णक ग्रंथ जे केवल एका वाचनेतच होते ते तसेच्या तसे प्रमाण मानले गेले म्हणूनच मूळ आणि टिकांमध्ये आपल्याला 'वायणंतरे पुण' अथवा 'नागार्जुनीयास्तु पठन्ति'२८ असा उल्लेख मिळतो.
अशाप्रकारे ह्या संमेलनात आगमज्ञान सुरक्षित आणि संग्रहित करण्यासाठी