________________
(३३)
गोष्ठामा हिलने हे ऐकले. त्यांनी आचार्यांना सांगितले की आत्मा आणि कर्म जेव्हा एकरूप होतात, तेव्हा ते कधीच पृथक् होत नाहीत, म्हणून हेच मानणे योग्य आहे की कर्म आत्म्याला केवळ स्पर्श करतात, त्याच्याबरोबर एकरूप होत नाहीत. अर्थात त्यांचा आत्म्याशी बंध होत नाही. आचार्यांनी त्यांना दोन्ही स्थितीचे रहस्य समजावून सांगितले, पण गोष्ठामाहिल आपल्या आग्रहावर दृढ राहिले. त्यांना संघातून वेगळे केले गेले. त्यांनी अबद्धिकवादाचा प्रचार केला.
जमालि, रोहगुप्त आणि गोष्ठामाहिल पुन्हा संघात आले नाहीत पण बाकीचे निह्नव प्रायश्चित्त करून जैन संघात सामील झाले. जे जैन संघात सामील झाले नाहीत त्यांचे आस्तित्व जैन संघात कोठेही उल्लेखित नाही. त्यांची कोणतीही परंपरा प्रचलित नाही. १३
जैन संघात पुन्हा आले त्यांना कशाप्रकारे समजावले गेले, कोणी समजावले इ. सगळे वर्णन उत्तराध्ययन सूत्राच्या विवेचनात प्राप्त होते. १४
१२. वर्तमान अवसर्पिणी काळातील चोवीस तीर्थंकर
भारतवर्ष अध्यात्म्याची जन्मभूमी आहे. चोवीस तीर्थंकरांनी ह्या अधात्म प्रधान भूमीवर जन्म घेतलेला आहे. जैन परंपरेत तीर्थंकरांचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. 'नमस्कार' महामंत्रात सिद्ध गुणांनी मोठे असतानासुद्धा प्रथम 'अरिहंत' तीर्थंकरांना नमस्कार केलेला आहे. तीर्थंकर सूर्याप्रमाणे तेजस्वी असतात. ते आपल्या ज्ञानाने विश्वाच्या आत्म्याला प्रकाशित करतात. ते मानवतेचे श्रेष्ठ संस्थापक आहेत. ते साक्षात् ज्ञाते, दृष्टे, आत्मनिर्भर आहेत. ते केवलज्ञान व केवलदर्शन प्राप्त झाल्यावरच जनतेला उपदेश देतात.
ऋषभदेव वर्तमान अवसर्पिणी काळात ह्या पवित्र भूमीवर पहिले तीर्थंकर ऋषभदेव झाले. जैन संस्कृती यांना ह्या अवसर्पिणी काळातील प्रथम राजा, प्रथम साधू, प्रथम जिन - केवली आणि प्रथम धर्मचक्रवर्ती मानते. १५
ते नाभिराज कुलकर आणि मरुदेवी महाराणीचे पुत्र होते. त्यांना शंभर पुत्र आणि ब्राह्मी व सुंदरी अशा दोन कन्या होत्या. त्यांनी आपली मोठी मुलगी ब्राह्मीला लिपी ज्ञानाची शिक्षा दिली, म्हणूनच ब्राह्मी लिपीला प्राचीन लिपी मानले आहे. दुसरी कन्या-सुंदरी हिला गणित विद्येचे ज्ञान दिले. मुलगा भरत याला स्थापत्य कला आणि बाहुबलीला चित्रकर्म इत्यादी शिकवले. राजसिंहासनावर बसल्यानंतर त्यांनी गणांची