________________
(३१)
MARRITERARINA
HTTARAKHARASHRIRASIRAM
जीव आहे. आचार्यांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना ते समजले नाही. त्यांना संघातून वेगळे केले गेले. तिष्यगुप्तांचा हा सिद्धांत 'जीव प्रादेशिक वाद' महणन ओळखला गेला. परंतु मित्र श्री श्रमणोपासकांनी समजवल्यानंतर त्यांना आपली चक समजली व ते पुन्हा महावीरांच्या संप्रदायात संमिलित झाले.
अव्यक्त वाद
'आषाढ' नावाचे आचार्य होते. त्यांच्या शिष्यांचा योगसाधनेचा अभ्यास चालू होता. आचार्यांना अचानक मृत्यू झाला. देवरूपात ह्यांनी विचार केला, आपल्या शिष्यांची साधना अपूर्ण राहिल. म्हणून त्यांनी पुन्हा स्वतःच्या शरीरात प्रवेश केला. शिष्यांच्या योगसाधनेचा अभ्यास पूर्ण झाल्यावर आचार्य देवरूपात प्रकट झाले आणि सांगितले की, "श्रमणांनो मी असंयमी असतानाही संयमी जनांचे वंदन (नमस्कार) स्वीकारले म्हणून मला क्षमा करा.'' इतके सांगून देव स्वस्थानी निघून गेले. साधूंना ही शंका आली की कोण साधू आहे, कोण देव आहे, काहीच निश्चितपणे सांगता येत नाही. सर्व काही अव्यक्त आहे. ह्या सिद्धांताला 'अव्यक्तवाद' म्हटले गेले.
हा वाद अथवा सिद्धांत आचार्य आषाढांमुळे पसरला म्हणून काही लोकांच्या मतानुसार आषाढ ह्याचे प्रवर्तक आहेत. परंतु तसे पाहिले तर ह्या वादाचे प्रवर्तक त्यांचे शिष्य होते. सामुच्छेदिक वाद
'कौडिन्य' नावाचे एक आचार्य होते. त्यांचे शिष्य अश्वमित्र त्यांच्याजवळ 'पूर्वा'चे ज्ञान शिकत होते. त्यात पर्यायवादाचा विषय आला. त्यात असे वर्णन आलेले आहे की क्षणाक्षणात पर्याय बदलतात. अश्वमित्राला हे योग्य वाटले नाही. त्यांनी एकांत सामुच्छेदाला स्वीकारले. समजावूनही जेव्हा त्यांना समजले नाही तेव्हा त्यांना संघातून बाहेर काढले. त्यांचा सिद्धांत 'सामुच्छेद' नावाने ओळखला गेला. द्वैक्रियावाद
'धनगुप्त' नावाचे आचार्य होते. त्यांचे शिष्य गंगमुनी होते. ते शरदऋतूत स्वतःच्या गुरूला वंदन करण्यासाठी जात होते. रस्त्यात उल्लुका नावाची नदी होती. ती पार करत असताना डोक्यावर सूर्याच्या उष्णतेचा अनुभव होत होता आणि पायाला नदीच्या पाण्याची शीतलता प्रतीत होत होती. गंगमुनींनी विचार केला की आगमात सांगितले आहे की एकाच वेळी दोन क्रियेचा अनुभव होत नसतो, परंतु मी हे प्रत्यक्षात
RIPADAISE