________________ (394) ज्याप्रमाणे दूध हे दूध आहे आणि पाणी हे पाणी आहे. दुध हे कधीही पाणी होऊ शकत नाही आणि पाणी कधी दूध होत नाही. एकत्र झाले तरी सुद्धा वास्तविक ते एकमेकात मिळत नाहीत परंतु एकमेकांत मिसळल्यासारखे दिसून येतात कारण कोणत्याही 'अन्य'मध्ये मिसळणे हा त्याचा स्वभावच नाही. कोणामध्येही मिसळण्यासाठी स्वतःचे आस्तित्व नष्ट करावे लागते आणि वस्तू स्वतःला कधीही नष्ट करू शकत नाही. त्याचप्रमाणे जीव हा जीव आहे आणि देह देह. जीव कधीही देह होऊ शकत नाही. जीवामध्ये देह मिसळू शकत नाही. संयोग पाहून केवळ मिसळले असे सांगितले जाते. वास्तविक ते तर एकमेकाहून भिन्न आहेत. ह्या बाबतीत आचार्य योगेन्दुदेव सुद्धा प्रेरणा देतात की पुद्गल अन्य आहे, जीव / अन्य आहे. अन्यचे सर्व व्यवहार सुद्धा अन्य आहेत म्हणून हे आत्मन् : तू पुद्गलाला सोडून आपल्या आत्म्याला ग्रहण कर त्यामुळे तू शीघ्रच संसारातून पार होशील.१९० ___ जो जीव अशुची शरीराहून वेगळा अशा शुद्ध आत्म्याला जाणतो तो शाश्वत सुखामध्ये लीन होतो व तो आत्मा सर्व शास्त्रांना जाणून घेतो.१९१ अर्थात ज्याने सर्व शास्त्राच्या सारभूत शुद्धात्मतत्वाला समजले आहे, त्यातच लीन झाले आहे. मूळ प्रयोजन सिद्ध झाल्याने जणू काही त्याने सर्व शास्त्रांनाच जाणले आहे. आत्मोपलब्धी करण्यासाठी, शरीराची भिन्नता जाणल्यानंतर अष्टकर्माच्या उदयाने होणाऱ्या जीवाची मोह-राग-द्वेषरूपी भावकर्माची भिन्नता जाणली पाहिजे. ह्याचे भेदज्ञान झाल्यानंतर ज्ञानानंद स्वभावी त्रिकाळ ध्रुव निज परमात्म तत्त्वाला जाणले पाहिजे. त्या परमात्मतत्त्वाला हृदयात धारण केले पाहिजे त्याचाच विचार केला पाहिजे. 'पर'ने भिन्नतेचे ज्ञानच भेदविज्ञान आहे, आणि 'पर'हून भिन्न चैतन्य देवाला जाणणे, मानणे, अनुभव करणे, आत्मानुभूती आहे, आत्मसाधना आहे, आत्माराधना आहे. संपूर्ण जिनागम आणि जिन अध्यात्म्याचे सार ह्यातच समाहित आहे. अन्यत्व भावनेच्या चिंतनाचा अंतिम परिणाम हाच आहे. अपने अपने सत्व कू, सर्व वस्तु विलसाय / ऐसे चिंतवे जीव तब, पर ते ममत न थाय // 192 प्रत्येक वस्तू स्वतंत्ररूपाने आपापल्या सत्तेत विलास करते. कोणाचा कोणाच्या बरोबर काहीच हस्तक्षेप नाही जेव्हा जीव अशाप्रकारे वस्तूच्या संपूर्ण भिन्नत्वाचा विचार करतो तेव्हा त्याला 'पर' पदार्थामुळे ममत्व उत्पन्न होत नाही. 12-9-04