________________
(३३५)
व्याधी आणि वेदनेने प्रचुर ह्या असार संसारामध्ये सुख नाही हे माहीत असतानासुद्धा हा जीव जिनेश्वर भगवंतांनी जो धर्म सांगितला आहे त्याचे आचरण करीत नाही. ह्यापेक्षा मोठे आश्चर्य ते काय असणार ?
इतक्या भयंकर दुःखाला पचविण्याची शक्ती संसारी जीवाला कोठून प्राप्त होते हा एक प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर म्हणजे सुखप्राप्तीची तीव्र आसक्ती. याच्या नशेत मनुष्य दुःख पचवून जातो. मानवावर जेव्हा काल्पनिक सुखाचा नशा चढते तेव्हा तो त्यासाठी सर्व दुःख गिळण्यास तयार होतो हे निर्विवाद सत्य आहे.
एका जंगली हत्तीने एका मनुष्याचा पाठलाग केला. मनुष्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आणि तो वेगाने पळू लागला. पळताना त्याला एक वृक्ष दिसला, तेव्हा त्याने त्या वृक्षावर जोरात उडी मारली आणि वृक्षाची एक फांदी घट्ट पकडली. त्या वृक्षाची फांदी विहिरीवर लटकत होती. इकडे शिकार हातातून निसटली असे मानून हत्ती क्रोधित झाला आणि त्या वृक्षाला आपल्या सोंडेत पकडून जोरजोरात हलवू लागला. त्या मनुष्याचे दुर्दैव असे की त्या विहिरीतून चार साप बाहेर आले आणि त्याच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न करू लागले. दुसरीकडे वृक्ष हलल्याने त्या वृक्षावरील मधमाश्यांचे पोळेसुद्धा हलले आणि सर्व मधमाश्या एकाचवेळी त्या मनुष्यावर तुटून पडल्या आणि त्याला डंख मारू लागल्या. आधीच संकटांनी त्रस्त झालेल्या त्याच्यापुढे हे आणखी एक संकट उभे राहिले. या सर्व गोष्टींचा विचार करत जेव्हा त्याने वर पाहिले तेव्हा त्याला एक काळा व एक पांढरा असे दोन जंगली उंदीर. तो ज्या फांदीवर बसला होता त्याच फांदीला कापत असताना दिसले. सर्वजण जण काही त्याच्या जीवनाचा ग्रास घेण्यासाठी उद्युक्त झाले होते. शरीराला डंख मारणाऱ्या मधमाशा डोक्यात वेदनेच्या ज्वाला उत्पन्न करीत होत्या.
___ अशावेळी एक घटना घडते. तो उंदराकडे वर पाहत असताना त्या मनुष्यांच्या ओठांवर पोळ्यामधून मधाचा एक थेंब टपकतो. बस ! काम झाले. तो सर्व दुःखांना सहन करू लागला. मधाच्या स्वादामध्ये तो स्वतःलाच विसरून जातो. त्याचवेळी एक दैवी विमान त्याची त्या दयनीय परिस्थितीतून सुटका करण्यासाठी येते. परंतु मधलोलुप मनुष्य त्यातून जाण्यास तयार होत नाही. त्याला मधाचे थेंब चाखणेच अधिक श्रेयस्कर वाटते. तो मधाचा आस्वाद घेण्यात इतका मग्न होतो की त्याला भोवतालच्या संकटाचे सुद्धा ध्यान राहत नाही. सुखाच्या तीव्र अनुरागात मनुष्य दुःख विसरतो. ह्यापेक्षा अधिक दुःखदायक ते काय ?