________________
आणि पुत्रवधूला 'माता' कसे बरे म्हणू ? असा विचार करून तो मौनपूर्वक राहू लागला. जेव्हा त्या कुमाराने यौवनावस्था प्राप्त केली त्यावेळी विशिष्ट ज्ञानी 'धर्मस्थ' नावाचे आचार्य त्या नगरीतील उद्यानामध्ये आले. त्यांनी आपल्या दिव्य ज्ञानाने पाहिले की नगरीत कोण प्रतिबोध प्राप्त करू शकेल ? दिव्य ज्ञानाने त्यांनी मौनव्रतीलाच योग्य समजले. म्हणून दोन साधूंना त्याच्या पूर्वजन्माच्या संबंधाचा एक श्लोक शिकवून प्रतिबोध देण्यासाठी त्यांच्याजवळ पाठविले. त्यांनी तिथे जाऊन अशाप्रकारे श्लोक उच्चारण केला
"तापस किमिणा मोणवएण पडिवज जाणिऊं धम्मं ।
मरिऊण सूयरोरग, जाओ पुत्रस्स पुत्रोत्ति ।।" अर्थात हे तापस ! ह्या मौन व्रताने काय फायदा ? तू मरून डुक्कर, सर्प आणि पुत्राचा पुत्र झाला आहेस. हे जाणून धर्माचा स्वीकार कर. आपल्या पूर्वजन्माचा वृत्तांत ऐकून प्रतिबोध प्राप्त करून त्याने त्याचवेळी आचार्यांजवळून सर्वज्ञ प्ररूपित अनगार धर्म स्वीकारला.९७
___या उदाहरणापासून मुमुक्षूने असा बोध प्राप्त केला पाहिजे की जो जीव ह्या जगाला अनित्य मानून वीतराग प्ररूपित धर्माचा शरण स्वीकारत नाही तो ह्या संसार चक्रात लाखो कठोर दुःखांना प्राप्त करतो. जगातील प्रसिद्ध सात चक्रांमध्ये संसारचक्र अत्यंत भीषण आहे. (१) जे रुपयांवर अंकित होते ते "अशोकचक्र'' आहे. (२) श्रीकृष्ण महाराजांच्या हातात असणारे 'सुदर्शन चक्र' आहे. (३) चक्रवर्तीच्या आयुध शाळेमध्ये उत्पन्न होते ते 'चक्ररत्न' आहे. (४) धर्मचिह्नाच्या रूपात तीर्थकरांच्या जवळ आकाशात चालते ते 'धर्म-चक्र' आहे. (५) दहा कोटानुकोटी सागरोपम प्रमाण उत्सर्पिणीचे सहा आरे आणि तितक्याच काळाचे अवसर्पिणीचे सहा ओर मिळून वीस कोटानुकोटी सागरोपम प्रमाणाचे एक काळचक्र आहे. (६) चार गतींमध्ये सतत भ्रमण करविणारे 'संसार चक्र' आहे. (७) संसारचक्राचा अंत करणारे सर्वश्रेष्ठ चक्र ज्यामध्ये दोन देव, तीन गुरू आणि चार धर्माचा नवपदमय मंडळ असणारे सातवे 'सिद्ध-चक्र' आहे.
संसारचक्रामध्ये जीवात्मा विविध योनीमध्ये जन्म-मरण करता करता उच्च-नीच कुळात जातो.
स्वतःला अत्यंत सुखी मानणारा देव आयुष्य पूर्ण झाल्यावर स्वर्गातून आनंद करत करत नीच गतीला प्राप्त करतो आणि कुत्रा स्वर्गात जाऊन देव होतो आणि क्षत्रिय