________________
(२९८)
यात आणि त्यांचे रक्षण करण्यात सुमद्राएवढे विपुल दुःख भोगावी लागतात. आणि पासन मिळणारे सुख तर पाण्याच्या थेंबाएवढेही नसते. कारण कितीही संरक्षण केले तरी शेवटी लक्ष्मी वियोगाचे दुःख देऊन निघून जाते.३७
लक्ष्मीची किती सेवा केली जाते हे सर्वजण प्रत्यक्ष पाहतात. थंडी असो वा गर्मी, त्याची चिंता केल्याशिवाय लक्ष्मीसाठी मानव गावोगावी भटकतो. तिला पेटी अथवा तिजोरीमध्ये सांभाळून ठेवतो. स्वतः कोठेही पडून राहील परंतु लक्ष्मीला वाचविण्यासाठी स्वतः झोप घेत नाही. आवश्यकता पडली तर स्वतःचे प्राणही गमावतो. तरीसुद्धा ही लक्ष्मी कोणाची होत नाही. किती निर्दयी आहे ती ! उपकाराचा बदला लक्ष्मी अपकाराने चुकवते. हे सर्व काही समजत असूनही लोक लक्ष्मीचा सदुपयोग करून लाभ घेत नाहीत. हातात येताच जर तिचा सदुपयोग करून घेतला तर मागून पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. परंतु हा दोष लक्ष्मीचा नाही मनुष्याचाच आहे. विचारशील मनुष्य लक्ष्मीचे दोष, तिची चंचलता इत्यादींचे चिंतन करून अनित्यतेच्या खोलवर उतरून लोभ, तृष्णा, गर्व, उद्धटपणा सोडणे हेच लक्ष्मीच्या अनित्यतेला समजण्याचे सार आहे.
लक्ष्मीप्रमाणेच यौवन, रम्यभवन, विपुल बळ, मनोहरिणी कांता, उच्चजाती, पर्वतासारखे विशाल हत्ती इत्यादी सर्व काही अनित्य आहे.
मानवाच्या शरीरात एका रोमा इतकीसुद्धा अशी जागा नाही की ज्यामध्ये रोगाची सत्ता नसेल. जेव्हा कर्माचा उदय होतो तेव्हा रोमारोमात रोग उत्पन्न होतात. आयुष्य हे फुटलेल्या घड्यातून टपकणाऱ्या पाण्याप्रमाणे क्षीण होत जात आहे. अशा अशुची युक्त क्षणभंगुर शरीराचा मोह का करावा ? ३८
ह्या जगामध्ये ज्यांना विशाल राज्याचे सुख होत, जवळ अपरिमित संपत्ती होती, अतुल बळ होते, जे पृथ्वीवर इंद्राप्रमाणे शासन करणारे होते. ते सुद्धा राहिले नाहीत तर साधारण लोकांची काय कथा ? संयोगाचा शेवट वियोगामध्ये होतो तरी संपर्कामुळे मनुष्य संयोगाला शाश्वत मानून बसला आहे. त्याने सतत चिंतन केले पाहिजे की, -
"सागर परिमित काल का आ जाता है अंत । सकल ऋद्धि तज चल बसे, सुरपति दुःख अत्यंत ।। रहा भरोसे काल के किया न कुछ सत्काम । मन की मन में ही रही, पहुँच गया यमधाम ॥'३९