________________
(२९७)
बाच्या रंगाप्रमाणे चार दिवसाचे आहेत, अधिकार गेल्यानंतर राजा रंक होतो, श्रीमंत होतो. अधिकार कोणाच्या थांबविण्याने थांबत नाही.
मत्यूसुद्धा अचानक येऊन उभा राहतो. मनुष्यजन्म पुन्हा प्राप्त करणे कठीण
नदीमध्ये पाण्याच्या लाटा येऊन जातात, परंतु त्या गेलेल्या लाटा पुन्हा कधीच देत नाही. त्याचप्रमाणे रूप, बल, इंद्रिय शक्ती, आयुष्य हे नष्ट झाल्यावर पुन्हा प्राप्त
त नाही. इंद्रजालाप्रमाणे लोकांना भ्रमित करणारे स्वजन, स्त्री, पुत्रादींचे प्रेम आहे, त्यासाठी अनीतीचे पापकर्म सोडून द्या आणि संयम नियम धारण करा. ह्या अनित्य भावनेला क्षणभर देखील विसरण्यासारखे नाही.
पूज्य श्री तिलोकत्ररुषी महाराजांनी अत्यंत प्रेरक शब्दात म्हटले आहे -
"अरे प्राणी जग माया सब काची, थे किम करी मानी छे साची रे प्राणी...
दुश्मन मरकर स्वजन होवे, स्वजन दुश्मन थावे, रागद्वेष करमा को बंधन क्यो निज माल गमावे... रे प्राणी"३६
अर्थात हे प्राणी ! ह्या जगाची माया कच्ची आहे. त्याला खरी का मानत आहेस. आज ज्याला शत्रू समजतो तो उद्या मित्र, स्वजन होऊन जाईन आणि जो मित्र आहे तो शत्रू होईल. तर मग आपले व परके असा भेद करून का स्वतःच्या आत्मिक संपत्तीला नष्ट करीत आहेत. इथे 'माया' या शब्दाचा अर्थ 'धन' आहे. हे धन क्षणिक आहे. त्याची नश्वरता दाखवताना म्हटले आहे -हे भद्र प्राणी, संसाराला मोहित करणारी लक्ष्मी वाऱ्याने कंपित होणाऱ्या दीपशिखेप्रमाणे अस्थिर आहे. तिला नष्ट होण्यास वेळ लागत नाही. हे सर्वकाही तुम्ही पाहत असतानाही 'ही लक्ष्मी माझी आहे' असे जे मानता तो तुमचा मूर्खपणा नाही का ? लक्ष्मी पुण्याने प्राप्त होते. पुण्य तर मर्यादित आहे, सीमित आहे. जेव्हा पुण्याची मर्यादा पूर्ण होते, पुण्य समाप्त होते तेव्हा ते पुण्याने प्राप्त झालेले सर्व पदार्थ नष्ट होतात. आयुष्य पूर्ण झाल्यावर परलोकामध्ये जावे लागेल तेव्हा मिळालेल्या लक्ष्मीचा अवश्य वियोग होईल. एक तर लक्ष्मीला सोडून तुम्हाला जावे लागेल नाही तर लक्ष्मी तुम्हाला सोडून जाईल. दुसऱ्या भवामध्ये नाही पण ह्याच भवात दोघांपैकी कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे लक्ष्मीचा वियोग होईलच. आई-वडील, पत्नी, कुटुंब, जन्मभूमी ह्या सर्वांना सोडून विशाल सागराला उल्लंघून क्रूर राज्याधिकारीच्या कठोर वचनाला सहन करून अतिशय कष्टाने धनाचा संचय केला. त्याच्या रक्षणासाठी अनेक उपाय केले तरी सुद्धा ते धन दीर्घकाळापर्यंत टिकत नाही. दुःखाचा विषय तर हा आहे की धन प्राप्त