________________
(२२७)
चार कषायानुबंधी अशुभ भावना
अभिधान राजेन्द्र कोशमध्ये नऊ अशुभ भावनांचे वर्णन आहे. हिंसा, असत्य इत्यादी पाच भावनांचे विवेचन केल्यावर आता चार कषाय भावनांचे विवेचन करू या.
१) क्रोधानुबंधी भावना २) मानानुबंधी भावना ३) मायानुबंधी भावना ४) लोभानुबंधी भावना.
या चार अशुभ भावनांचे वर्णन करण्यापूर्वी यांना कषाय का म्हटले आहे, यावर विचार करू या.
कषाय -
आत्मामध्ये जे कलुषित परिणाम आहेत त्याला कषाय म्हणतात. 'कष' म्हणजे संसार (जन्ममरण) 'आय' म्हणजे लाभ. ज्यामुळे संसारातील परिभ्रमण होते ते कषाय होत. ६८ संसाराचा महाल कषायावर टिकलेला आहे. क्रोध, मान, माया, लोभ हे चार संसाररूपी महालाचे स्तंभ आहेत. जोपर्यंत हे खांब मजबूत असतील तोपर्यंत संसारमहल मजबूत राहील. तोपर्यंत जन्म, मरण, नरक, तिर्यंच निगोद इत्यादींचे दुःख जीवाला भोगावे
लागतात.
श्रमण म. महावीरांनी सांगितले आहे
चत्तारि एए कसिणा कसाया सिंचति मूलाई पुणभवस्स ६९
कषायामुळे आत्म्याचे जितके नुकसान होते तितके अन्य कोणत्याच शत्रूमुळे होत नाही. कषाय असणारा मनुष्य राक्षससारखा वागतो. क्षमाशील मनुष्य देवतुल्य आहे. कषाय विष आहे. कषायाचे शमन करणे अमृतासारखे आहे. ज्याचा आत्मा काय आहे. त्या आत्म्यात ज्ञान, दर्शन, चारित्र्याचा समावेश होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे काळ्या कपड्यावर दुसरा रंग चढत नाही. त्याचप्रमाणे कषायाने कलुषित आत्म्यावर धर्मरंग चढत नाही.
-
ह्या चार कषायांमुळे अशुभ भावनेची उत्पत्ती होते. आणि हे चार कषाय मोहामुळे उत्पन्न होतात. राग आणि द्वेष ही मोहाची दोन रूपे आहेत. राग भावनेमुळे माया आणि लोभ कषाय उत्पन्न होतात आणि द्वेषामुळे क्रोध आणि मानाची उत्पत्ती होते.
स्थानांग सूत्रात वर्णन आहे- "दोस वत्तिया मुच्छा दुविहा कोहे चेव माणे चेव, पेज बत्तिया मुच्छा दुविहामाए चेव लोहे चेव'७०