________________
(२०६)
पायावर उभे आहे. म्हणून मनुष्याचे हे कर्तव्य आहे की हिंसात्मक अशुभ भावनेचा त्याग करून अहिंसात्मक भावनेचे चिंतन करावे.
मृषानुबंधी भावना
मनुष्याच्या शरीरात जोपर्यंत ऊर्जा आहे तोपर्यंत त्याला 'जिवंत मनुष्य' असे म्हटले जाते. परंतु थंड शरीर पडल्यावर 'मृत मनुष्य' असे समजले जाते. याचप्रमाणे आपल्या शरीरात जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत जिवंत म्हटले जाते. अशक्त, दुर्बळ मनुष्य तर मृताप्रमाणे
भासतात.
"शक्ती जीवन आहे. दुर्बलता मृत्यू आहे. '
शक्ती जीवन आहे. परंतु विचार केला पाहिजे की कोणती शक्ती जीवन आहे ? एखादा मनुष्य खाऊन, पिऊन, व्यायाम करून स्वस्थ, सशक्त होतो. परंतु आजारी पडला अंतर अशक्त होतो. याचाच अर्थ असा की शारीरिक शक्ती अस्थायी आहे. ह्याला जीवन म्हणता येणार नाही. कोणी पैशाला शक्ती मानतात, परंतु ती लक्ष्मी चंचल आहे. मग कोणती शक्ती मिळविली पाहिजे. कोणत्या शक्तीने जीवन उन्नत होऊ शकेल ? मनुष्याची बुद्धी वृद्धावस्थेमध्ये कमी होते, सत्ता अस्थिर आहे. सत्तेलाही वार्धक्याचे भय आहे. मग कोणते बळ स्थायी आहे ? कोणते बळ जीवनाला प्रशस्त करू शकेल ?
शक्तीचे दोन भेद आहेत - आसुरी आणि दैवी शरीरबळ, बुद्धिबळ, रूपवळ, विद्याबळ इत्यादी बळांचा उपयोग असत् प्रवृत्तीमध्ये होतो तेव्हा त्या शक्तीला आसूरी शक्ती म्हणतात. रावणामध्ये अत्यंत बळ होते परंतु त्याचा त्याने दुरुपयोग केला म्हणून त्याच्या शक्तीची गणना आसूरीमध्ये होते.
एक सत्यबळच स्थायी स्थिर आहे. याने जीवन उन्नत होते. परंतु आज स्वार्थामुळे मनुष्य असत्याचा आधार घेतो.
असत्याचा आधार त्याच व्यक्ती घेतात ज्यांच्या जीवनात गुणांना काहीच स्थान नसते. जे क्षुद्र, हीन प्रवृत्तीचे आहेत तेच असत्याचा आधार घेतात. असत्य बचन बोलताना मनात कलुषित भावना निर्माण होते. असत्यता स्व-पर भय उत्पन्न करते. असत्य भावना ही दुःखदायक अपयशकारी, वैर उत्पन्न करणारी आहे. असत्यतेमुळे क्लेश होतो. धूर्तता, अविश्वास, अशुभ फळ व दुर्गती यांमध्ये जन्ममरण करविणारी असत्यताच आहे. इहलोकात निंदा व तिरस्काराचे पात्र बनविणारी असत्यता आहे.