________________
(२०५)
नसेचे चौथे तत्त्व आहे - स्वनियंत्रण
आपले आपल्यावर, आपल्या आवेशावर नियंत्रण करू शकल्याशिवाय अहिंसेची अदा करू शकणार नाही. आपले अनियंत्रित आवेशच आपल्या वृत्तीला हिंसक तात. स्वनियंत्रणाचा फायदा म्हणजे आपण आपल्याबद्दल अहिंसक बनणे हे आहे.२६
दसऱ्याबद्दल अहिंसक बनण्यापूर्वी स्वतःच स्वतःच्या बद्दल अहिंसक बनणे श्यक आहे. आपल्याला फार लांब लांब गोष्टीत न गुंतता सीमित सुधार करायचा हे जी व्यक्ती स्वतःसाठी अहिंसक असते ती दुसऱ्यासाठी अभयदाता असते. आणि ही व्यक्ती कोणासही धोका देत नाही किंवा धोका निर्माण करीत नाही.
जी व्यक्ती स्वतः अहिंसक आहे ती दुसऱ्यांसाठी सुद्धा अहिंसक बनते. प्रथम स्वतःच्या हृदयातील अग्नी विझवायचा आहे. तो विझला तरच शांती होईल आणि मग शांतीसाठी वेगळा प्रयत्न करावा लागणार नाही. म्हणून स्वनियंत्रण फार महत्त्वपूर्ण आहे.
_आज मनुष्य जीविकेसाठी जितका चिंतित आहे तितका जीवनासाठी जर चिंतित असता तर आज ती मानवाची परिस्थिती झाली आहे तशी झाली नसती. आज विश्व विनाशाच्या पथावर उभे आहे. शांती आणि सुखाच्या शोधात तो हे विसरून जातो की ज्याप्रमाणे अग्नी अग्नीला वाढवतो त्याचप्रमाणे हिंसा हिंसेला वाढविते. फलत: आपल्या हातात काहीच येत नाही.
_ हिंसा, मांसाहार, बॉम्ब यांनी संसार आज जितका व्याकुळ, व्यग्र झालेला दिसतो तितका पूर्वी कधीच नव्हता. भगवान महावीरांच्या अहिंसेची आज जितकी आवश्यकता असेल तितकी कदाचित त्यांच्या काळातही नसेल. कारण भगवान महावीर यांच्या वेळी मनुष्य पशुबळी देत होते. परंतु आज मनुष्य मनुष्याचीच हत्या करत आहे. आज मनुष्याला मनुष्यांपासूनच भय वाटत आहे. थोड्या पैशांसाठी तो आपले जीवन, मान सुद्धा अग्नीत समर्पित करण्यास तयार आहे.
अहिंसा एका व्यक्तीचा किंवा धर्माचा सिद्धांत नाही तर हा सर्व धर्माचा पाया आहे. आचारामध्ये जी समता आहे तीच अहिंसा आहे. हिंसा सर्व पापाची जननी आहे म्हणूनच अठरा पापस्थानांमध्ये हिंसेचे स्थान सर्वात पहिले आहे. हिंसा हे एक असे विशाल पापस्थान आहे की त्याच्या मानसिक, वाचिक व कायिक भेदातही अन्य पापांचा समावेश आहे.
अहिंसा, शांती आणि समृद्धीचा आधार आहे व मनुष्याचे चारित्र्य अहिंसेच्या