________________
(१९८)
मेचे मूळ कारण मनुष्य आजिविकेसाठी हिंसा करतो. शरीराला सुंदर की सजविण्यासाठी व पुष्ट करण्यासाठी हिंसा करतो. कस्तुरी मिळविण्यासाठी साला मारून टाकतो. सुंदर चामड्यासाठी प्राण्यांना मारतो, अनेक पशूचा वध
तासाठी हत्ती मारतो ही सर्व कार्ये हिंसक दिसतात. परंतु त्यामागे मनुष्याचा भावती आहे. प्रत्येक हिंसेचे मूळ कारण राग आहे. चोर, डाकू, आतंकवादी हे
र हिंसा करीत नाहीत. सैनिकांचे सुद्धा कोणाबरोबरही शत्रुत्व नसते. आपल्याला असे वाटते की मनुष्य द्वेषामुळे हिंसा करतो. परंतु त्यामागची भूमिका पाहिली तर द्वेषामुळे नाही. परंतु रागभावनेने हिंसा होते.
मनुष्य भेळमिसळ करतो. त्यामुळे हजारो लोकांचे स्वास्थ बिघडते, लोक पक्षघाता पिरलिसेस)चे शिकार होतात. त्यांच्याशी भेळमिसेठ करणाऱ्याचा काहीच संबंध नसतो, देष नसतो. भेळमिसळचे कारण राग आहे- मी धनाढ्य होईल, मग ती सुखाने राहू शकेन.
हिंसेचे कारण विरोध, भय, दुसऱ्यांच्या अधिकाराला नष्ट करणे, दुसऱ्यांना हीन मानने, अभिमान, स्वतःला हीन समजणे इ. आहे. नाश, मृत्यू, अपयश, रोग इत्यादी भयांमुळे सुद्धा मनुष्य हिंसक बनतो.
संसारी जीवन निर्वाह करताना देहधारीसमोर अनेकहिंसेचे प्रसंग येतात अशा परिस्थितीत अहिंसक वृत्तीने वागणे कठीण जरी असले तरी असंभव तर नाहीच.
श्रमण भगवान महावीरांनी हिंसेचे स्थूल आणि सूक्ष्म असे दोन प्रकार सांगितले आहेत.
सूक्ष्म हिंसेत पृथ्वी, पाणी, अग्नी, हवा, वनस्पती ह्या पाचांचा समावेश होतो. दैनिक व्यवहारात ह्याचा संपूर्णपणे त्याग अपेक्षित नाही तरी विवेकी मानवाने हे लक्षात ठवणे आवश्यक आहे की ही सूक्ष्म हिंसा आहे. स्थूल हिंसेत मुंगी, मुंगळे इ. पासून पशू, पक्षी व मनुष्यापर्यंत सर्व चालत्या फिरत्या प्राण्यांचा समावेश होतो. चालत्या फिरत्या कोणत्याही जीवाची मुद्दाम हिंसा करू नये.
_ हिंसा करणारा नेहमी चिंतीत राहतो कारण हिंसा प्रतिहिंसेला जन्म देते. प्राण्यांचे प्राण घेणेच हिंसा आहे असे नाही. मंत्राद्वारे दुसऱ्यांना नुकसान पोहचवणे, जादूटोणा करणे, कटुवाणीचा प्रहार करणे इत्यादी सर्व हिंसेचे प्रकार आहेत. जर कोणी कटुवाणी अथवा आक्षप इत्यादींनी उत्तेजित होऊन आत्महत्या करून घेतली तर आत्मघातीबरोबर अक्षेप पणारा सुद्धा पातकी ठरतो म्हणून हिंसेची भावना दुर्गतिदायक आहे. मग ती हिंसा धर्म,