________________
( १९७)
हे वृक्ष कापून ह्यापासून घर, खांब, पाट इ. बनविण्यायोग्य आहे. कंदमुळाच्या औषधी किती पौष्टिक आणि स्वादिष्ट आहे. हे किडे, ढेकूण, मच्छर इ. जीवांना मारले गेले पाहिजे. जलचर मासे, भूचर, गाय इत्यादी वनचर डुक्कर इत्यादी, खेचर पक्षी इत्यादी, शिजवून खाण्यायोग्य आहे ही सर्व हिंसक भावना आहे. १६
शत्रूसेनेचा नाश केला पाहिजे. चित्रविचित्र पक्षांना पिंजऱ्यात ठेवले आहे ते किती चांगले केले आहे ! ती तर म्यूझिमची शोभा आहे.
उंदरामुळे रोगांची उत्पत्ती होते म्हणून ते मारण्यायोग्य आहेत. साप, विंचू इत्यादी विषमय जीवांना अवश्य मारलेच पाहिजे. अशा प्रकारचे सर्व विचार आणि असेच अन्य विचार हिंसक आहेत.
अश्वमेध यज्ञात अग्नीमध्ये घोडा होमायला पाहिजे. तर नरमेध यज्ञात मनुष्य हा धर्म आहे, त्याने स्वर्ग मिळतो ह्या सर्व भावना हिंसेला जन्म देणाऱ्या आहेत.
कित्येक हिंसक शास्त्राचे अभ्यासक असे म्हणतात की अमुक जनावरांचे अंगोपांग, मांस, रक्ताचे अमुक पद्धतीने सेवन केले तर अमुक रोगांची शांती होते. कित्येक मनुष्य मनोरंजनासाठी कुत्रे इत्यादी शिकारी प्राण्यांद्वारे निरपराधी पशुपक्ष्यांना पकडवून आनंदाचा अनुभव करतात. कुत्रा, माकड इत्यादी पशूंकडून नृत्य, खेळ, तमाशा करवून आनंदाचा अनुभव करतात.
प्राण्यांमध्ये भांडणे लावून ते बघण्यात आनंद मानतात अशाप्रकारे हिंसक भावनेने अनेक लोकांना आनंद मिळतो.
कित्येक लोकांना जीवांचा संहार करण्यासाठी हिंसक भावनेने बंदुक, धनुष्यबाण, तलवार, कटार, चाकू, सूरी इत्यादींचा संग्रह करण्यात आनंद प्राप्त होतो. ती शस्त्रे पाहून जीवांना मारण्याची भावना ठेवतात. ह्या हिंसक भावना आहेत.
कोणाच्या अकल्याणाची भावना करणे, दुसऱ्याच्या अनिष्टाचे चिंतन करणे, स्वतःपेक्षा जास्त रूपवान, गुणवान, पुण्यवान, प्रतापी आणि सुखी लोकांना पाहून ईर्ष्या करणे, त्यांना दु:खी करण्याचा विचार करणे ही हिंसानुबंधी भावना आहे.
अशाप्रकारे कोणत्याही प्राण्याला दुःख देण्याचा विचार करणे अथवा प्राणीबधापासून उत्पन्न बस्तूची अनुमोदना करणे ही सुद्धा हिंसानुबंधी अशुभ भावना आहे. १७