________________
(१९३)
असते त्यांच्यामध्ये अशुभ भावना काम करत आहे हे सहज समजू शकत.
प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी शुभ प्रिय आहे. अशुभ अप्रिय आहे. परंतु फार थोडी प्रजा संसारात पुण्यशाली अशी आहे की, ज्यांना नेहमी सुखाचा आणि शुभाचा अनुभव होतो. अशुभाचे अनुकरण लवकर होते. परंतु शुभ भावनेसाठी मात्र पुरुषार्थ करावा
लागतो.
जगातल्या पदार्थामध्ये अल्प सुख, बुद्धी अथवा त्या पदार्थाप्रती सुखदुःखाची भावना आणि त्यातून उत्पन्न होणारे कषाय, राग इ. भाव अशुद्ध आहेत.
ज्या जीवाला ज्या ज्या पदार्थांची रुची असते. त्या त्या पदार्थांचेच तो चिंतन करतो. जसे व्यापारी माल आणि ग्राहकाचे, गृहिणी व्यवहार आणि गृहकार्याचे, कुंभार मातीचे अथवा घड्याचे अशा रागादी भावांची उत्पत्ती होणे अथवा तसेच संकल्प विकल्प करणे ह्या सर्व अशुभ भावना आहेत.
हिं सानुबंधी भावना
अशुभभावनेच्या प्रथम नऊ भेदात पहिली भावना हिंसानुबंधी भावना आहे. प्राकृतमध्ये "पाणिवह" अर्थात प्राण्यांचा वध करण्याची भावना हिंसानुबंधी भावना आहे.
भावना म्हणजे चिंतन. ज्याचे चिंतन सतत हिंसक असतात त्याला रौद्र ध्यान म्हणतात. रौद्रध्यानात जीव चोरी, असत्य, परिग्रहसंग्रह आणि सहा प्रकारच्या जीवांची हिंसा होईल अशा कार्यात उद्यमशील राहतो. ८
सहा प्रकारच्या जीवांची हिंसा म्हणजे १) पृथ्वी, २) पाणी, ३) अग्नी, ४) वायू, ५) वनस्पती, ६) त्रस जीव.
म्हणजे दोन इंद्रियांपासून पंचेन्द्रिय जीवाची हिंसा करणे, त्यांचे छेदन - भेदन करणे, त्यांना बांधणे, त्याचा वध करणे, त्यांची ताडना करणे, त्यांना जाळणे इत्यादी कार्यात प्रयत्न करणे, उद्यम करणे, रौद्रध्यान आहे.
रौद्रध्यान व हिंसानुबंधी भावनेचा अर्थ जवळजवळ सारखाच होतो. रौद्रध्यानात सर्व अशुभ भावनांचा समावेश होतो तेव्हा हिंसानुबंधी भावना तर रौद्रध्यानाचा केवळ एक भेदमात्र आहे. ९
तसे पाहिले तर असत्य, चोरी, अब्रह्मचर्य, परिग्रह हे सर्व पाप हिंसकच आहेत. श्री अमृतचंद्राचार्यांनी पुरुषार्थसिध्युपायामध्ये हिंसेचे विस्तृत विवेचन केले आहे.