________________
(१९२)
किया न करता सुद्धा अशुद्ध भावनेने तंदुलमत्स्यासारखा जीवही सातव्या नरकात वा तर अन्य मोठ्या जीवांची काय कथा १६
पत्येक जीवाच्या अंतःकरणात शुभ, अशुभ किंवा शुद्ध ह्या तीन भावनांपैकी सनी ना कोणती तरी भावना सतत चालूच असते. त्यात शोक, चिंता, भय, व्याकुळता पारखे दःखद विचारांचे चक्र पुन्हा पुन्हा चिंतन करणे म्हणजे अशुभ भावना आहे.
प्रिय वस्तू प्राप्त करण्याची तालावेली, अप्रिय वस्तूंच्या संयोगाने द्वेष होणे व त्यातून सुटण्यासाठी व्याकूळ होणे.
रोगिष्ट अवस्थेत माझे काय होईल अशाप्रकारे भय व चिंताकरणे ह्या सर्वच अशुभ भावना आहेत.
क्रूर, हिंसक भावना निर्माण होणे आणि आनंदित होणे ह्या सुद्धा अशुभ भावना आहेत.
अभिधानराजेंद्र कोशामध्ये 'भावना' शब्दाच्या परिभाषेनंतर भावनेचे दोन भेद सांगितले आहेत १) प्रशस्त २) अप्रशस्त. सर्वप्रथम अप्रशस्त भावनेचे नऊ भेद सांगितले आहेत.
पाणिवह - मुसावाए अदत्त मेहुण परिग्गहे चेव ।
कोहे माणे माया लोहे य हवंती अपसत्था । १) हिंसानुबंधी भावना, २) मृषानुबंधी भावना, ३) स्तेयानुबंधी भावना, ४) मैथुन संबंधी भावना, ५) परिग्रह संबंधी भावना, ६) क्रोधानुबंधी भावना, ७) मानानुबंधी भावना, ८) मायानुबंधी भावना, ९) लोभानुबंधी भावना.
। वास्तविक हे नऊ भेद अव्रत आणि कषाय यांच्याशी संबंधित आहेत. त्यांचा समावेश आनव भावनेमध्ये होतो. परंतु तरीदेखील यांचा विषय तर त्यांच्या नावावरूनच स्पष्ट होतो. तो असा की, जेव्हा हिंसादी भावना उत्पन्न होतात तेव्हा मन आर्त आणि रौद्र ध्यानात एकाग्र होते. मनामध्ये तसेच भाव जागृत होतात. त्या विषयीचे मनात विचार तरंगित होतात. त्याचे थोडक्यात विवेचन आपण ह्या प्रकरणात पाहू.
__ अशुभ भावनेची ओळख मनुष्याच्या वृत्ती आणि प्रवृत्ती यांद्वारे केली जाते. ज्यांची प्रवृत्ती उपरोक्त नऊ अशुभ भावनानुरूप असते, ज्यांच्यामध्ये मानसिक, वाचिक व कायिक उच्छृखलता, क्षुद्रता, दुःसाहस, स्वच्छंदचारीता, इंद्रियांची उच्छृखलता, क्रूरता