________________
'भावनाबोध' या ग्रंथाचे श्लोक अत्यंत हृदयस्पर्शी आहेत. हे गुजराती भाषेत लिहिलेले आहेत. आयुष्याच्या चौतिसाव्या वर्षी समाधी मरण म्हणजे 'संलेखना व्रता' सहित यांचा
(१८१)
मृत्यू झाला.
यांनी 'भावनाबोध' पुस्तकामध्ये दहा भावनांचे दहा चित्र (पाठ) प्रस्तुत केले आहेत. यांनी सहाव्या भावनेचे नाव 'निवृत्तिबोध' दिले आहे ही भावना संसार भावनेसारखीच आहे. दहा चित्र समाप्त झाल्यानंतर बोधिदुर्लभतेचे वर्णन आहे, परंतु धर्मभावन ह्यामध्ये नाही. भावनाबोधाचे अनेक लेखकांनी विवेचन केले आहे. पंडित गुणभद्रजी यांनी ह्याचे गुजरातीमध्ये विवेचन केले आहे. श्रीमद् राजचंद्राद्वारे प्रणीत 'भावनासंग्रह' नावाच्या पुस्तकामध्ये सोळा भावनांचे विस्तारपूर्वक विवेचन केलेले आहे.
श्री जयसोम मुनी यांनी 'बारह भावनानी सज्झाय' नावाची पद्यबद्ध रचना केली. ही गुजराती भाषेमध्ये आहे. राजस्थानी आणि गुजरातीमध्ये धार्मिक गितीकांना 'डाळा' म्हणतात. त्यांनी विभिन्न रागामध्ये बारा ढाळामध्ये बारा भावनांची रचना केली आहे. बाराव्या ढाळीच्या शेवटी यांचे प्रगुरू श्री विजयदेवसुरि आणि गुरू श्री विजयसिंगसूरीचा नामोल्लेख केला आहे. तेरावी ढाळ, जी उपसंहारात्मक रूपाने घेतली आहे. त्याच्या शेवटच्या कडव्यामध्ये ह्याची रचना 'जेसलमेर' मध्ये वि. सं. १७०६ आषाढ शुक्ल त्रयोदशीला झाली असा उल्लेख आहे. आचार्य विजयभुवनसूरी यांनी गुजरातीमध्ये याचे विवेचन केले आहे.
-
-
पंडित भूधरदासजी महान कवी व पंडित होते. यांचे लेखन सरस, मनोरम आणि अध्यात्मपूर्ण आहे. यांनी वि. सं. १७८१ मध्ये 'जैनशतक काव्य' १०७ श्लोकामध्ये लिहिले आहे.
यांनी १८०१ मध्ये 'पुरुषार्थ सिद्धयुपाय' या ग्रंथावर वचनिका लिहिली आहे. याशिवाय आणखीन काही लहान लहान रचनाही केल्या आहेत.
यांच्या बारा भावनांवरील दोन पद्यमय रचना अत्यंत प्रभावशाली आहेत. त्यातील 'राजा राणा छत्रपती' हे दोहे तर जैन धर्मावलंबी लहान लहान मुलांना कंठस्थ आहेत. क्षुल्लक मनोहरलाल वर्णी हे खंडेलवाल जातीचे सांगानेरचे निवासी होते. अत्यंत धार्मिक आणि उदारवृत्तीचे असे हे उदार कवी होते. यांनी हिंदीमध्ये ग्रंथरचना केली आहे. वि. सं. १७०५ मध्ये 'धामपुर' येथे लिहिलेल्या रचनेचे नाव ‘धर्मपरीक्षा’ आहे. ह्याची ‘ज्ञानचिंतामणी' वि. सं. १७२८ मध्ये 'बुरहणपुर' येथे लिहिली गेली आहे.