________________
(१७१)
२) अवधूत योगींचे जीवनदर्शन वाच्या. संतांच्या जीवनदर्शनाविषयी सामग्री उपलब्ध होत नाही कारण योगी महापुरुषांचे अधिकांश जीवन अध्यात्माच्या उपलब्धितच व्यतीत होत होते. वाना आपल्या प्रार
आपल्या प्रसिद्धीची कोणत्याही प्रकारे इच्छा नव्हती किंवा त्या संदर्भात त्यांची कोणतीच प्रवृत्ती नव्हती. ख्याती, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा यांच्या व्यामोहातून मुक्त
गया ह्या योगी महापुरुषांना एकमात्र अध्यात्माचेच चिंतन असायचे, जगाच्या तापमानापासून ते सर्वथा अलिप्त राहत होते. लोकेषणेचा अजगर, जो आज बहुतांश कांना गिळंकृत करीत आहे त्याच्यापासून ते खूप दूर राहत होते. त्यांच्या रचनेमध्येही विशिष्ट घटनेचा किंवा नावाचा उल्लेख प्राप्त होत नाही की ज्यामुळे त्यांच्या जीवनाची थोडी फार माहिती आपणास प्राप्त होऊ शकेल. तरीसुद्धा कोणत्या तरी म्हणीच्या अथवा अन्य सामग्रीच्या आधारे आपण त्यांच्या बाह्य-आंतरिक व्यक्तिमत्त्वाचे थोडेफार दर्शन करू शकतो.
अधिकांश संतांचे जीवन सखोलपणे पाहिले तर ते मोठे अवधूत योगी दिसून येतात. अवधूत योगी अशा लोकांना म्हणतात ज्यांना आत्म्याशिवाय अन्य कोणत्याच वाद्यवस्तूचे ध्यान राहत नाही. आणि म्हणूनच अशा लोकांचा परिचय प्राप्त करण्यासाठी अनेक लेखकांना दिव्य पुरुषार्थ करावे लागले. तरीही मोठमोट्या महत्त्वपूर्ण ग्रंथांचे रचनाकार कोण होते, त्यांची रचना केव्हा झाली ह्याविषयी अजूनपर्यंत विशेष माहिती मिळालेली नाही.
_ शिलालेख पट्टावली आणि टिकाकारांच्या व्याख्येवरून त्यांच्या जीवनाविषयी अंदाज केला आहे. ह्यामुळेच यांचा काळ 'हा मानला जात आहे' किंवा 'मानला आहे' अशी विधाने करावी लागतात.
भावनेसंबंधी ज्या ज्या आचार्यांनी, संतांनी, विद्वानांनी थोडक्यात किंवा विस्तृतपणे गद्यमय, पद्यमय आणि गद्यपद्यात्मक शैलीत ज्या रचना केल्या आहेत त्यातील काही ग्रंथकारांचा, लेखकांचा आणि कवींचा इथे थोडक्यात परिचय दिला जात आहे.
- आचार्य कुंदकुंद - हे दिंगबर संप्रदायाचे सर्वाधिक सन्मानित आचार्य होते. इसवी सनाचे पहिले आणि विक्रमसंवत्सराचे तिसरे शतक असा यांचा काळ मानला जातो. खाचे नाव प्रथम 'पद्मनंदी' होते. परंतु 'कोंडाकुंदपुरात' राहणारे असल्याने पुढे ते कोडकुंदाचार्य' या नावाने प्रसिद्ध झाले. त्याचेच श्रुतिमधुर नाव 'कुंदकुंदाचार्य' असे झाले.