________________
(१७०)
प्रकरण चवथे
भावना विषयक साहित्यकारांचा परिचय आणि
अकल्याणकारी अशुभ भावना
भावनेचे प्रतिपादन करणाऱ्या आगमोत्तर काळच्या काही साहित्यकारांचा परिचय
जैन आचार्य, संत आणि विद्वानांद्वारे प्राकृत आणि संस्कृतमध्ये जेथे जेथे भावनेच्या रचना किंवा साहित्य प्राप्त झाले आहे त्याचे विश्लेषणात्मक आणि तुलनात्मक रूपात ह्या शोधग्रंथात प्रस्तुतीकरण करण्याची भावना आहे. त्याचबरोबर जैन धर्मात जैन कवी, लेखक आणि उपदेशकांची सुद्धा नेहमी ही भावना असते की, लोकभाषेत सुद्धा धार्मिक साहित्याची रचना करावी, ज्यामुळे ती रचना सामान्य जनतेला सुद्धा सहजपणे आकलन होईल आणि जनता ते आत्मसात करेल. प्राकृत आणि संस्कृत तर सामान्य लोकांना समजत नाही. भगवान महावीरांच्या काळात तर प्राकृतचे स्थान अपभ्रंशाने घेतले आणि नंतर उत्तरवर्ती काळात अपभ्रंशापासून आधुनिक आर्यभाषेचा विकास झाला. ज्याच्यात हिंदी, गुजराती, राजस्थानी, मराठी इत्यादी अनेक भाषेच्या क्षेत्रात जैन धर्माचा विशेषरूपाने प्रसार झाला, म्हणून त्या त्या भाषेच्या कवी आणि लेखकांनी आपल्या आपल्या भाषेत साहित्य रचना केली. त्यातही अनेक लेखकांनी बारा भावनांवर विशेषतः पद्यात्मक शैलीत रचना केल्या. त्यामुळे भावनांचे धार्मिक साधनेमध्ये नेहमी महत्त्व राहिले आहे. हेच ह्या रचनेने सिद्ध होते.
१९ व्या शतकाच्या शेवटपर्यंत प्राकृत संस्कृत, हिंदी, गुजराती, राजस्थानी आणि मराठी मधील रचनेचे पद्यमय आणि गद्यमय पुस्तके प्राप्त होतात. वर्तमान शताब्दीच्यासुद्धा अनेक रचना आहेत. प्रथम त्या लेखकांचा परिचय संक्षिप्त रूपात ह्या प्रकरणात दिला जात आहे. तद्नंतर संक्लिष्ट अर्थात अशुभ, भावनेचे वर्णन केले आहे कारण अशुभच्या हयतेला समजून त्याचा त्याग केला तरच शुभ अथवा शुद्धतेपर्यंत जाण्याचा मार्ग प्रशस्त
होईल.
ROMARRAYentHIVRINDERNITERSोश्यारDETAwareneNTSYSTITUAmevarilyHANIWwwantraoyeumsmperory