________________
(१४०)
तुम्ही बोधी का प्राप्त करीत नाही ? जो वर्तमानात बोधी प्राप्त करीत नाही त्याला पुढच्या बाधी सुलभ होत नाही. जर जीवनाची दोरी तुटली किंवा जीवन असेच व्यतीत मले तर त्याला पुन्हा प्राप्त करणे सुलभ नाही. २६
मातसुद्धा बोधी
म्हणून क्षणाक्षणाचा विचार करा. समजा, हा क्षण बोधी प्राप्त करण्याचा आहे. अर्थात वेळ वाया जाऊ देऊ नका, २७ जीवन अनित्य आहे. ह्या संसारात बाल, वृद्ध ut आणि गर्भस्थ शिशुदेखील मृत्यूच्या अधीन होतात, हा काळ बहिरी ससाण्याप्रमाणे प्राण्यावर
घालतो. त्याला नष्ट करतो. तसेच आयुष्य क्षीण झाल्यावर मृत्यूसुद्धा प्राण्याचे प्राण हरण करतो. जीवन नष्ट करून टाकतो. ३८
ह्याच संदर्भात आठव्या अध्ययनामध्ये उल्लेख आहे की जीवात्मा संसारातील कोणत्याही उच्च स्थानी असला, मग तो देवलोकाचा इंद्र किंवा मनुष्य लोकातील चक्रवर्ती, बलदेव अथवा वासुदेव असला तरी सर्वांना एके दिवशी हे जग आणि आपल्या स्वजनांना सोडून जावेच लागते कारण स्वजनांचा सहवास अनित्य आहे. ३९
जो साधक मेधावी, प्राज्ञ आहे त्याने अनित्यतेचा विचार करून आसक्ती दूर करावी आणि तीर्थंकरांद्वारे सांगितल्या गेलेल्या सम्यगदर्शन, ज्ञान, चारित्र्यात्मक मोक्षमार्गाचा स्वीकार करावा. ४०
ह्याच्या नवव्या अध्ययनात सांगितले आहे की, संसारी जीव पापकर्माने दुःखी होता. त्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांचे आई-वडिल, बांधव, पुत्र, पत्नी यापैकी कोणीच समर्थ नाही.४१ अशाप्रकारे अशरण भावनेचे विवेचन आले आहे. पुढे असेही सांगितले आहे की, ह्या सर्वांना अशरणरूप मानून असा विचार करावा की आपल्या पापकर्मामुळे दुःख भोगणाऱ्या प्राण्याचे रक्षण कोणीही करू शकत नाही. म्हणून एकमेव आश्रय सम्यक् दर्शन, सम्यक् ज्ञान, सम्यक् चारित्र्यादी आहे. हे योग्यप्रकारे समजून ममत्वरहित आणि निरहंकारी बनून साधकाने जिनेंद्र भगवानांनी सांगितलेल्या धर्माचे आचरण करावे. ४२
ह्याच्या दहाव्या अध्ययनात साधूने एकत्व भावनेचे चिंतन केले पाहिजे, असा निर्देश केलेला आहे. असे केल्याने साधक संगमुक्त होतो. त्याला सांसारिक बंधन स्पर्श करू शकत नाही. अर्थात तो मुक्त होतो. ही भावना संगमुक्तीचे कारण आहे. हीच भावना समाधीचा मुख्य हेतू आहे. ४३
ह्याच्या दूसऱ्या अध्ययनामध्ये अशरणतेचा उल्लेख करताना म्हटले आहे की •अज्ञानी मनुष्याला असे वाटते की धन, संपत्ती, पशू, ज्ञानीजन हे सर्व रक्षण करणारे आहेत.