________________
परिचय मिळवण्याच्या भावनेने साधनेच्या अनुकूल मनोभूमी तयार करण्यासाठी प्रयत्नशील होते.
'डुबते को तिनके का सहारा' ह्या म्हणीप्रमाणे माझ्यासारख्या अल्पज्ञ साध्वीला संसार सागरातून पार करण्यासाठी गुरू भगवंतांची असीम कृपा प्राप्त झाली. ज्या संप्रदायात माझी दीक्षा झाली त्या श्रमणसंघाचे आचार्य सम्राट पूज्य श्री. आनंदऋषीजी महाराजांद्वारा लिखित 'भावनायोग एक विश्लेषण' हा ग्रंथ वाचण्याचा सुवर्णयोग आला. तेव्हा माझा एम. ए. चा अभ्यास चालला होता. या ग्रंथात आलेल्या आलेखनाचे चिंतन करतानाच मनात निर्णय केला की जर भविष्यात पीएच. डी. करण्याची संधी मिळाली तर 'भावना' या विषयावरच पूर्णपणे कार्य करेल व जैन दर्शनामध्ये भावनेविषयी विविधदृष्टीने प्राकृत, संस्कृत तसेच अन्य भाषेत जे लेखन झाले आहे त्याचा रसास्वाद घेऊन तात्त्विक विचारांचे समीक्षात्मक अध्ययन करण्याचा निर्णय केला.
याहशी भावना यस्य सिद्धिर्भवति ताशी ॥'
पाराप्रमाणे माझ्या मनात उत्पन्न झालेल्या भावनेला सिद्धी मिळाली आणि एम. ए. पास झाल्यानंतर पीएच. डी. करण्याचा योग मिळाला. योगायोगाने पुणे विद्यापीठाने पण या विषयासाठी मान्यता स्वीकृती दिली. ह्याला मी माझ्या परम वंदनीय परमउपकारी गुरुदेव आणि गुरुणीमैयांचा असीम कृपाप्रसाद समजते.
जैन साधुचर्येत समर्पित जीवनात वीतरागप्रभूच्या आज्ञेत राहून आचारधर्माचे पालन करता करता संयम आणि वैराग्याला उत्तरोत्तर विशद्ध करणे. मोक्ष मार्गाची उपासना करणे, तसेच स्व-पर कल्याणाच्या प्रवृत्तीचा विकास करणे हा माझा अनिवार्य धर्म आहे. आणि म्हणूनच भावनांविषयी विस्तृत अभ्यास करण्याचा माझा मनोरथ जास्त सुदृढ झाला.
मानवाच्या चित्तात उठणारे विविधभाव जेव्हा भावनेत परिवर्तित होतात तेव्हा मानव खऱ्या अर्थात कल्याणाच्या मार्गात प्रगती करण्यासाठी पुरुषार्थ करतो. गणधर भगवान यांनी आगम ग्रंथात आणि आगमोत्तर काळात समर्थ आचार्य भगवान आणि मुनी भगवंतांनी भावना या विषयी खूप मन खोलून आलेखन केले आहे. जैन दर्शनात भावने संबंधी आणि त्यांच्या प्रकारसंबंधी व मानव कल्याणासाठी, त्याच्या उपयोगितेसंबंधी खूप विस्तृत आलेखन झाले आहे.