________________
(१२५)
पत्र म्हणजे जे कर्मनिजरेला कारण आहे तेच भावनेच्या अशुद्धीमुळे आसवांचे म्हणजे
कर्मबंधाचे कारण होते.
चतुर्थ अधययनाच्या उद्देशकामध्ये अन्यत्व भावनेचा संकेत प्राप्त होतो. संपेहाए" ह्या वाक्यात एकत्व आणि अन्यत्व अनुप्रेक्षेचा उल्लेख स्पष्ट दिसून येतो. येथे आगमकाराचे मन्तव्य असे आहे की, 'जो शरीर आणि आत्म्याच्या भेदज्ञानात निपुण आहे त्यालाच पंडित म्हणतात. असा वीतराग निरूपित धर्माज्ञेचा आकांक्षी पंडित एकमात्र आत्मपरीक्षण करता करता कर्माला कंपित करतो.'
आचारांग सूत्राच्या पंधराव्या अध्ययनाचे नाव 'भावना' आहे. परंतु यात योजलेला 'भावना' शब्द बारा भावनांच्या अर्थामध्ये येत नाही. परंतु व्रतांचे अखंडपणे पालन करण्यासाठी हा शब्द आला आहे. मनामध्ये दृढता आणि स्थिरतेची अत्यंत आवश्यकता आहे कारण त्याचा मार्ग अत्यंत कठीण आहे. तसेच व्रताचे अत्यंत चांगल्या प्रकारे अनुसरण करणेही कठीण आहे.
व्रताच्या मार्गावर सतत चालण्याची शक्ती प्राप्त करण्यासाठी प्रत्येक व्रताच्या पाच-पाच भावना सांगितल्या आहेत. त्यामध्ये त्या त्या व्रताच्या स्वरूपाचा आणि आचरणाचा भाव वेगवेगळ्या रूपात प्रकट केलेला आहे.
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रहाबरोबर जोडलेल्या तथ्यांचे ह्यात जे आकलन झालेले आहे ते पठनीय आहे. व्रतांशी संबंधित ह्या भावनांबद्दल चिंतन केल्यास, पुन्हा पुन्हा त्यांचा अभ्यास केल्यास मनात स्थिरतेचा अणि दृढतेचा संचार होतो. साधक चांगल्या प्रकारे व्रताचे पालन करू शकतो आणि आपल्या लक्ष्याच्या दिशेने पुढे पुढे मार्गक्रमण करतो,
अशा प्रकारे आचारांग सूत्रामध्ये वर्णित पाच महाव्रतांच्या पंचवीस भावनांचे यामध्ये विवेचन केले जात आहे.
अहिंसा महाव्रताच्या पाच भावना
१) ईर्या समिती भावना ईर्या म्हणजे चर्या. चर्येमध्ये गमनक्रियेमध्ये समिती अर्थात सम्यक् प्रकारे प्रवृत्ती करणे, आपल्या कार्यासाठी प्राणी, भूत, जीव आणि सत्त्वाचे हनन करू नये, त्यांना धूळ इत्यादीने झाकू नये, संताप देऊ नये, भय उत्पन्न करू नये अशाप्रकारे संयमाच्या गमनाची सम्यक् प्रवृत्ती ईर्या समिती आहे. ६