________________
९०
प्रथमः पादः
(सूत्र) ईद्धैर्ये ।। १५५।। (वृत्ति) धैर्यशब्दे ऐत ईद् भवति। धीरं हर विसाओ। (अनु.) धैर्य या शब्दात, ऐ चा ई होतो. उदा. धीरं...विसाओ.
(सूत्र) ओतोद्वान्योन्य-प्रकोष्ठातोद्य-शिरोवेदना-मनोहर-सरोरुहे
क्तोश्च वः ।। १५६॥ (वृत्ति) एषु ओ तोऽत्वं वा भवति तत्संनियोगे च यथासम्भवं
ककारतकारयोर्वादेशः। अन्नन्नं अन्नुन्नं। पवट्ठो पउट्ठो। आवजं आउज्जं। सिरविअणा सिरोविअणा। मणहरं मणोहरं। सररुहं
सरोरुहं। (अनु.) अन्योन्य, प्रकोष्ठ, आतोद्य, शिरोवेदना, मनोहर आणि सरोरुह या
शब्दांत ओ चा अ विकल्पाने होतो आणि त्याच्या सांनिध्यामुळे शक्य असेल तेथे ककार आणि तकार यांना 'व' असा आदेश होतो. उदा. अन्नन्नं.....सरोरुहं.
(सूत्र) ऊत्सोच्छ्वासे ।। १५७।। (वृत्ति) सोच्छ्वासशब्दे ओत ऊद् भवति। सोच्छ्वास: सूसासो। (अनु.) सोच्छ्वास या शब्दात ओ चा ऊ होतो. उदा. सोच्छ्वासः सूसासो.
(सूत्र) गव्यउ-आअ: ।। १५८।। (वृत्ति) गोशब्दे ओत: अउ आअ इत्यादेशौ भवतः। गउओ। गउआ। गाओ।
हरस्स एसा गाई। (अनु.) गो या शब्दात ओ चे अउ आणि आअ असे आदेश होतात. उदा.
गउओ....गाई.
१ धैर्यं हरति विषादः।
२ हरस्य एषा गौः।