________________
प्राकृत व्याकरणे
(अनु.) सैन्य या शब्दात तसेच दैत्य इत्यादि प्रकारच्या शब्दांत ऐ चा अइ असा
आदेश होतो. (आदि ऐकाराचा) ए होतो (सू.१.१४). या नियमाचा (प्रस्तुत नियम) अपवाद आहे. उदा. सइन्नं ; दइच्चो...चइत्तं. (यांचे मूळ संस्कृत शब्द क्रमाने असे:-) (सैन्य।) दैत्य...चैत्य, इत्यादि. (संयुक्त व्यंजनातील अवयवांचा स्वरभक्तीने) विश्लेष झाला असताना, (ऐ चा अइ) होत नाही. उदा. चैत्यम् चेइअं. आर्ष प्राकृतात:- चैत्यवन्दनम् (चे)
ची-वंदणं (असे वर्णान्तर होते). (सूत्र) वैरादौ वा ।। १५२।। (वृत्ति) वैरादिषु ऐत: अइरादेशो वा भवति। वरं वेरं। कइलासो केलासो।
कहरवं केरवं। वइसवणो वेसवणो। वइसंपायणो वेसंपायणो। वइआलिओ वेआलिओ। वइसिअं वेसिअं। चइत्तो चेत्तो। वैर। कैलास। कैरव। वैश्रवण। वैशम्पायन। वैतालिक। वैशिक। चैत्र।
इत्यादि। (अनु.) वैर इत्यादि शब्दांत ऐ चा अइ असा आदेश विकल्पाने होतो. उदा.
वहरं...चेत्तो. (या शब्दांचे मूळ संस्कृत शब्द क्रमाने असे:-) वैर...चैत्र,
इत्यादि. (सूत्र) एच्च दैवे ।। १५३।। (वृत्ति) दैवशब्दे ऐत एत् अइश्चादेशो भवति। देव्वं दइव्वं दइवं। (अनु.) दैव या शब्दात ऐ चा ए आणि अइ असा आदेश होतो. उदा. देव्वं...दइवं.
(सूत्र) उच्चैर्नीचैस्यैअः ।। १५४।। (वृत्ति) अनयोरैतः अअ इत्यादेशो भवति। उच्चअं। नीचअं। उच्चनीचाभ्यां
के सिद्धम् ? उच्चैर्नीचैसोस्तु रूपान्तरनिवृत्त्यर्थं वचनम्। (अनु.) उच्चैः आणि नीचैः या दोन शब्दांत, ऐ चा अअ असा आदेश होतो. उदा.
उच्चअं, नीचअं. (मग) उच्च आणि नीच या शब्दांपासून कोणती (वर्णान्तरे) होतात? तथापि उच्चैः आणि नीचैः या शब्दांची अन्य रूपे होत नाहीत, हे सांगण्यासाठी (इथले) विधान आहे.